कार्तिकी पौर्णिमे निमित्ताने, अंबोडे ता जि.पालघर येथील बुद्धविहारात दिपप्रज्वलन कार्यक्रम संपन्न*आयोजक डॉ. निलेश राऊत - मित्र फाउंडेशन
*कार्तिकी पौर्णिमे निमित्ताने, अंबोडे ता जि.पालघर येथील बुद्धविहारात दिपप्रज्वलन कार्यक्रम संपन्न* आयोजक डॉ. निलेश राऊत - मित्र फाउंडेशन पालघर ७ नोव्हेंबर सफाळे ( एच लोखंंडे ) आशिया खंडात आणि भारत देशात प्रत्येक पौर्णिमा या दिवसाला प्रत्येक धर्मात, जातीत पंथात विषेस महत्व आहे. या अनुषंगाने अंबोडे ता.जि.पालघर येथील बुद्धविहारात कार्तिक पौर्णिमा, निमित्ताने डॉ.निलेश राऊत मित्र फाऊंडेशन, पालघर यांच्या वतीने आणि नालंदा बुद्ध विहार ट्रस्ट अंबोडे यांच्या सहकार्याने कार्तिक पौर्णिमा निमित्त दीप प्रज्वलित करण्यात आले. यावेळी विपश्यना या विषयावर विपश्यना केंद्र अल्याली ता. जि. पालघर येथील केंद्र शिक्षक आयु. अनिल जाधव यांनी आलेल्या आपल्या बांधवांना बौद्ध पौर्णिमा आणि गौतम बुद्ध आणि बौद्ध धर्माची तत्व यावर समाज प्रबोधन करीत योग्य ते मार्गदर्शन केले. तर डॉ. निलेश राऊत यांनी विपश्यना आणि बौद्ध धम्म यावर आपले विचार मांडले. यावेळी उपस्थितांना मन एकाग्र करून मनावर ताबा कसे मिळवावा आणि आंतरिक शांती आणि सद...