कै. श्री. नरसिंह दुबे उर्फ पू. बाबूजी यांची १५ वी पुण्यतिथी संपन्न

*कै. श्री. नरसिंह दुबे उर्फ पू. बाबूजी यांची १५ वी  पुण्यतिथी संपन्न*
२९ जानेवारी
पालघर  ( एच. लोखंडे ) श्री नरसिंह के. दुबे चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित नालासोपारा पुर्व ता. वसई जि. पालघर, आयुर्वेद मेडिकल कॉलेज एवं रुग्णालय द्वारा साल बाद प्रमाणे  यावर्षीही परम पूज्यनीय कै. "बाबूजी" श्री नरसिंह दुबे यांच्या १५व्या पुण्यस्मृती निमित्तानं दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी दोन सत्रात कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला 
      कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व धन्वंतरी स्तवनाने करण्यात येऊन, पहिल्या सत्रात, नि:शुल्क चिकित्सा शिबिर मध्ये ११७७  रुग्णांनी विविध  चिकित्सेचा लाभ घेतला. यावेळी रक्त तपासणी, इसीजी, एक्स-रे इत्यादी परीक्षण चिकित्सकांच्या सल्ल्यानुसार मोफत केले गेले.तर  गरजू रुग्णांना अल्पदरामध्ये चष्मा वाटप सुद्धा केले तसेच ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे अशा रुग्णांवर एक आठवड्यामध्ये नि:शुल्क शस्त्रक्रिया केल्या जातील असे ही सांगितले. महाविद्यालयाच्या सभागृहात पहिल्या सत्रात सुदृढ बालक प्रतियोगिता संपन्न झाली. त्यावेळी प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. शुभांगी ठाकूर - पोदार आयुर्वेद कॉलेज वरळी, डॉ. संदीप राजपूत- बालरोग तज्ञ. येरला मेडिकल ट्रस्ट आयुर्वेद कॉलेज खारघर, या परीक्षकांनी स्पर्धक बालकांचे परीक्षण करून  निर्णय दिला. या प्रतियोगिता मध्ये ६ महिने ते २  वर्ष वयोगटातील बालकांना मध्ये  प्रथम - व्योम बिष्ट, द्वितीय-  सेहरीश खाटीक, तृतीय- अनैश सिंग यांना तर  २ वर्ष ते ४  वर्ष गटामध्ये, प्रथम-  प्राप्ती दाखिणकर, द्वितीय- श्राव्या तरे, तृतीय- हेजल राठोड, ४  ते ६ वर्ष गटामध्ये, प्रथम - नेत्रा ठोंबरे, द्वितीय-  मानवी परब,  तृतीय-  चैतन्य कोलते. यांना विजेते पारितोषिक प्राप्त झाली.  सर्व गटातील - प्रथम पारितोषिक विजेते, १५०१/- ₹, द्वितीय पारितोषिक विजेते, १००१ /-₹, तृतीय पारितोषिक ७५१ /-₹ व प्रमाणपत्र , ट्रॉफी देऊन मान्यवर यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. 
              दुपारच्या सत्रामध्ये  संभाषा प्रतियोगितेच्या प्रथम फेरीतील ९९ स्पर्धकांमधून निवडलेल्या १५ स्पर्धकांची अंतिम फेरी घेण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय, डेंटल, आयुर्वेद, होमिओपॅथी, नर्सिंग, फिजिओथेपी व अन्य क्षेत्रातील महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सदर स्पर्धेसाठी खालील चार विषय देण्यात आलेले. १) मानसिक आरोग्य प्रथमोपचार : शारीरिक प्रथमोपचार इतकेच महत्वाचे. २) रियलिटी टेलिव्हिजन शोची वास्तविकता. ३) स्व-चिकित्सा- हानी पोहोचवण्याचा मार्ग कि बरे होण्याची संधी?. ४) किशोरवयीन आत्महत्या- उपाय नाही तर शोकांतिका. 
   या स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री. अमित भिडे (एबीपी माझा), डॉ. रवींद्र देशपांडे -  फिजिशियन,  नालासोपारा, प्रोफेसर डॉ. एम.ए. अन्सारी - रिसर्च  मार्गदर्शक एच एस एन सी विद्यापीठ, मुंबई यांनी परिक्षण केले. स्पर्धकांचे -  सादरीकरण, शब्दोच्चारण, आत्मविश्वास, विषयाची निवड,  प्रभाव इत्यादि गुणवत्तेनुसार स्पर्धकांना प्रथम,  द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले. १) स्वरा सावंत, प्रथम क्रमांक-  अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय १०,०००/- ₹ स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र,२) दिव्या पटील, व्दितीय क्रमांक - नालासोपारा आयुर्वेद मेडिकल कॉलेज,७००० /- ₹ स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, ३) कृष्णा रामदास रामावत, तृतीय क्रमांक-  विरार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज ५००० /- ₹ स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ, सनी वर्मा- भवन्स कॉलेज ३०००/- ₹ स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन विजेत्यांना संस्थेचे अध्यक्ष श्री जयप्रकाश दुबे आणि परीक्षक गणांच्या हस्ते रोख रक्कम, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. पारितोषिके वितरणा समारंभा अती, परम पूज्यनीय बाबूजींच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. या वेळी सर्व अध्यापक, अध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी व नालासोपारा परिसरातील प्रतिष्ठित व्यक्ती, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होती.
         भोजपुरी / अवधी कवी  आयोजित संमेलनाच्या  अध्यक्षस्थानी वाराणसीचे ज्येष्ठ कवी “निडर” जौनपुरी  विराजमान होते. कवी संमेलनाचे संचालन प्रो. डॉ.  चंद्रभूषण शुक्ल यांनी केले. संमेलनाला कवी, अॕड. राजीव मिश्रा-  जौनपुर / अंधेरी, मुंबई / श्री. हृदयानंद "विशाल" देवरिया  / ठाणे, जवाहरलाल "निर्झर" मऊ /जोगेश्वरी, मुंबई, रासबिहारी पांडे भभुआ कैमुर / नालासोपारा पालघर,  प्रतिमा तिवारी - देवरिया रांची, झारखंड, दिनेश मिश्र " बैसवारी"उन्नाव / विरार पालघर, जानकीरामन "रहबर"- कुशीनगर /जोगेश्वरी, मुंबई, रवी यादव आजमगढ/ सायन,मुंबई, रुस्तम "घायल" बेतिया / जोगेश्वरी, मुंबई, जियाउल हक- छपरा / नेरुल, नवी मुंबई लक्ष्मीशंकर मिश्र "शब्द साधक" जौनपुर / ठाणे इत्यादी कवींनी हास्य,व्यंग, करूण, शृंगार आणि वीर रस इत्यादी कवितांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सर्व भोजपुरी/ अवधी भाषिक महिला आणि पुरुषांनी या कवी संमेलनाचा आनंद घेतला , कार्यक्रम समाप्ती नंतर सर्वानी "स्वरूची भोजन" कार्यक्रमाचा आनंद लुटला.

Comments

Popular posts from this blog

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

शिवसेना ( उबठा ) गटाचे डहाणू ता. प्रमुखासह शेकडो कार्यकर्त्यांचा मा. हितेंद्रजी ठाकूर ( आप्पा ) यांच्या उपस्थितीत ब. वि. आघाडी मध्ये जाहीर प्रवेश

मोठा अपघात! मुंब्रा येथे ट्रेनमधून ट्रॅकवर पडून 5 प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जखमी