Posts

हरवलेल्या आरती संतोष स्वामी यांचा शोध; नागरिकांना पोलिसांचे आवाहन

Image
हरवलेल्या आरती संतोष स्वामी यांचा शोध; नागरिकांना पोलिसांचे आवाहन सफाळे (प्रतिनिधी) : वेळंगी येथून बेपत्ता झालेल्या ३३ वर्षीय आरती संतोष स्वामी यांचा केळवा सागरी पोलिसांकडून शोध सुरू असून, त्यांच्याबाबत माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संतोष नागराज स्वामी (वय ३३, रा. वेळंगी, पो. आगरवाडी, ता. जि. पालघर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पत्नी आरती संतोष स्वामी या ११ ऑगस्ट २०२६ रोजी वेळंगी येथील राहत्या घरातून वैतरणा-विरार (ता. वसई) येथील फार्मसी कंपनीत पगार आणण्यासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्या. मात्र, त्या पुन्हा घरी परतल्या नाहीत. याबाबत केळवा सागरी पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली असून, मनुष्य मिसिंग रजिस्टर क्रमांक ०६/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली आहे. हरवलेल्या आरती संतोष स्वामी यांचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे : वय ३३ वर्षे, शिक्षण ९ वी, उंची ५ फूट २ इंच, रंग गोरा, बांधा मध्यम, डोळे काळे, केस मोठे व काळे. त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर ‘आरती’ नाव गोंदवलेले आहे. गळ्यात मंगळसूत्र व काळे मणी असून, बेपत्ता होताना त्यांनी हि...

गुलाबपुष्पातून सलोख्याचा संदेश; तारापूर पोलिसांकडून ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा

Image
गुलाबपुष्पातून सलोख्याचा संदेश; तारापूर पोलिसांकडून ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा तारापूर (प्रतिनिधी): सण-उत्सवांच्या माध्यमातून सामाजिक एकोपा आणि बंधुभाव अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने तारापूर पोलिसांनी आगळ्या पद्धतीने ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा देत शांतता व सलोख्याचा संदेश दिला. पोलिसांनी मुस्लिम बांधव, भगिनी तसेच लहान मुलांना गुलाबपुष्प देऊन ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या. आगामी ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर सोमवार, २४ ऑगस्ट २०२६ रोजी तारापूर पोलीस ठाणे आणि मुस्लिम सुन्नत जमात, तारापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या आदेशानुसार तसेच बोईसरचे डी.वाय.एस.पी. बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी तारापूर पोलीस ठाण्याचे API प्रविण देशमुख, वाणगाव पोलीस ठाण्याचे API पाचपुते, चिंचणी पोलीस चौकीचे PSI नंदगावे, मुस्लिम सुन्नत जमातचे अध्यक्ष शोएब अत्तारी, चिंचणी मुस्लिम सुन्नत जमातचे कासिम मुछाले, मुख्तार गवंडी, नसरुद्दीन सोपरकर, राजू गवंडी, नौशाद सैनिला, सरफुद्दीन गवंडी, चिंचणी जमातचे मंजूर शेख, साद...

परिचारीका ठरल्या देवदुत, नवजात बालकांचे प्राण वाचविले.

Image
परिचारीका ठरल्या देवदुत, नवजात  बालकांचे  प्राण वाचविले. दिनांक :२६ऑगस्ट २०२६ मुंबई प्रतिनिधी (सतिश पाटील ) करावे तेवढे कौतुक आणि वेळीच दाखवलेले धाडस,,, सोमवारी पहाटे साडेतीन वाजताची ती वेळ. संपूर्ण अमरावती शहर गाढ झोपेत होते. जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात परिचारिका ललिता कासदेकर नेहमीप्रमाणे अतिशय काळजीपूर्वक नवजात बालकांची शुश्रूषा करत होत्या. शांतता पसरलेली असतानाच अचानक एका व्हेंटिलेटरचा भीषण स्फोट झाला. छतावरील आपत्कालीन वॉटर सिस्टीम जळून खाक झाली, व्हेंटिलेटरचे तुकडे-तुकडे उडाले आणि काही क्षणांतच संपूर्ण कक्षात काळोखासोबत धुराचे प्रचंड लोळ उठले. डोळ्यांसमोर मृत्यूचे तांडव दिसत असताना, स्वतःचा जीव वाचवण्याऐवजी तिथे उपस्थित असलेल्या दोन परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दाखवलेले धाडस अमरावतीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल. स्वतःचे हात आगीत भाजले तरी चालेल, पण काचेच्या पेटीत बंद असलेल्या निष्पापांना मरू द्यायचे नाही, या एकाच जिद्दीने डफरीनच्या या देवदूतांनी तब्बल ३६ चिमुरड्यांचे प्राण वाचवले.या जिल्हा स्री रूग्णालय अतिदक्...

फेरतपासणीपासून प्रशासनाला एवढी भीती का? संशयित दिव्यांग शिक्षकाला ‘संरक्षण’ कुणाचे?

Image
फेरतपासणीपासून प्रशासनाला एवढी भीती का? संशयित दिव्यांग शिक्षकाला ‘संरक्षण’ कुणाचे? वसई/प्रसाद भालेराव      पंचायत समितीच्या शिक्षण विभागाअंतर्गत कळंब केंद्रात कार्यरत असलेल्या एका शिक्षकाच्या दिव्यांगत्वाबाबत लेखी तक्रारीद्वारे गंभीर शंका उपस्थित करण्यात आली आहे. संबंधित शिक्षकाच्या दिव्यांग प्रमाणपत्राची फेरतपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आलेली असतानाही पंचायत समिती प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस फेरतपासणीची कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून संबंधित शिक्षकाला पाठीशी घातले जात आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.      उपलब्ध तक्रार अर्जानुसार, संबंधित शिक्षकाच्या दिव्यांगत्वाबाबत संशय व्यक्त करून प्रशासनाकडे लेखी स्वरूपात दाद मागण्यात आली आहे. अशा तक्रारीनंतर संबंधित प्रमाणपत्राची वैधता, दिव्यांगत्वाची टक्केवारी आणि शासनाच्या निकषांनुसार पात्रता यांची अधिकृत वैद्यकीय तपासणी होणे अपेक्षित असताना, प्रशासनाकडून त्याबाबत कोणतीही ठोस हालचाल होत नसल्याचा आरोप आहे. तक्रार गंभी...

विद्युत मीटर बसविण्यासाठी १ लाख २५ हजारांची लाच घेणारे दोघे एसीबीच्या जाळ्यात

Image
विद्युत मीटर बसविण्यासाठी १ लाख २५ हजारांची लाच घेणारे दोघे एसीबीच्या जाळ्यात दिनांक :२६ऑगस्ट २०२६ मुंबई प्रतिनिधी (सतिश पाटील ) कंत्राटी रिक्षाचालक जयंता शिवकर आणि कंत्राटी वीजतंत्री दर्शन साळवी यांच्याविरोधात कोपरी पोलिसांत गुन्हा दाखल ठाण्यात बांधकामासाठी तात्पुरते विद्युत मीटर बसवून देण्यासाठी लाच घेताना महावितरणच्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना एसीबीने अटक केली. बांधकामाच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात नवे विद्युत मीटर बसवून देण्यासाठी एक लाख ३० हजार रुपयांची लाच मागून त्यातील एक लाख २५ हजार रुपये घेताना दोन खासगी व्यक्तींना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. जयंता शिवकर व दर्शन साळवी अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. जयंता हा महावितरणमध्ये कंत्राटी रिक्षाचालक म्हणून कार्यरत असून दर्शन हा कंत्राटी वीजतंत्री (इलेक्ट्रीशियन) आहे. या दोघांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे कोपरी येथील मंगला विद्यालय परिसरात बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी तात्पुरत्या स्वरूपात नवे विद्युत मीट...

एडवण येथील अंगणवाड्यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून पाहणीबालकांच्या पोषण, आरोग्य आणि पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या सुविधांचा घेतला आढावा

Image
एडवण येथील अंगणवाड्यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून पाहणी बालकांच्या पोषण, आरोग्य आणि पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या सुविधांचा घेतला आढावा पालघर(प्रतिनिधी), दि. २६ जीऑगस्ट : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी एडवण येथील तीन अंगणवाड्यांना भेट देऊन तेथील विविध सेवांची पाहणी केली. यावेळी त्यांनी बालकांना दिला जाणारा आहार, पोषण, पूर्व प्राथमिक शिक्षण तसेच उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला. अंगणवाडीतील बालकांच्या पोषणस्थितीची माहिती घेताना पोषण ट्रॅकरवरील वजन व उंचीच्या नोंदींचीही पाहणी करण्यात आली. बालकांच्या आरोग्य व पोषणस्थितीवर नियमित लक्ष ठेवावे तसेच पोषण ट्रॅकरवरील सर्व नोंदी वेळोवेळी अद्ययावत ठेवाव्यात, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी संबंधित अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिल्या. अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना केवळ पोषण आहारच नव्हे, तर गुणवत्तापूर्ण पूर्व प्राथमिक शिक्षण मिळणे आवश्यक आहे. बालकांच्या शारीरिक, बौद्धिक आणि सामाजिक विकासाला चालना देण्यासाठी उपलब्ध सुविधांचा प्रभावी वापर करावा आणि आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी याव...

१लीत शिकणाऱ्या मुलांच्या मृत्यू कारणीभूत, असलेली "मासवण आश्रमशाळा" शासनाने ताब्यात घ्यावी — सीता घाटाळ, श्रमजीवी संघटना*

Image
*१लीत शिकणाऱ्या मुलांच्या मृत्यू कारणीभूत, असलेली "मासवण आश्रमशाळा" शासनाने ताब्यात घ्यावी — सीता घाटाळ, श्रमजीवी संघटना* २६ऑगस्ट  पालघर ( एच लोखंंडे ) पालघर जिल्ह्यातील, मासवण येथील अनुदानित आश्रमशाळेत इयत्ता १ ली मध्ये शिकणाऱ्या ७ वर्षीय श्रेयांश अंबात या विद्यार्थ्याचा तापामुळे झालेला दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. हि अत्यंत गंभीर घटना असून, या घटनेच्या अनुषंगाने मासवण ता .जि.पालघर येथील आश्रमशाळा शासनाने तातडीने ताब्यात घेऊन शासकीय आश्रमशाळा म्हणून चालवावी, कारणं कातकरी, स्थलांतरित आदिवासी मुलांच्या सुरक्षा, आरोग्य, आणि दर्जेदार शिक्षण यांचा मुलभूत हक्कांचा प्रश्न आहे. यासाठी श्रीम. सिता घाटाळ - श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्षा यांनी मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केली आहे.        कु. श्रेयांश अंबात यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर श्रीम. सीता घाटाळ यांनी मासवण आश्रमशाळेला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील शैक्षणिक, निवासी स्थान, आणि तेथील आरोग्यविषयक परिस्थितीची संपुऐ माहिती घेतली असताना , त्यांनी मा . मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शासनाच्या तातडीच्या हस्...