आंबेडकर नगर येथे विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप

आंबेडकर नगर येथे विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप

पालघर(प्रतिनिधी )(पूर्व) : सामाजिक बांधिलकी जपत बिज दत्ता वेलफेअर असोसिएशन सामाजिक ट्रस्ट व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई) यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेडकर नगर, पालघर पूर्व येथील गरजू विद्यार्थ्यांना मोफत शाळेपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके व इतर आवश्यक शालेय वस्तू देण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना शैक्षणिक वाटचालीत मदत करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमाला चेअरमन, जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, राम ठाकूर, दीपेश गायकवाड, सचिन घाडीगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सामाजिक उपक्रमासाठी रींगल बुकचे सुमित भाई, ABV चे गोविंदू सर, VBHC चे प्रीतम सर आणि ईशीचे शैलेश भाई यांचे विशेष सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले असून, भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

केळवेत अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमध्ये संताप; चौकशीची मागणी

शिवसेना ( उबठा ) गटाचे डहाणू ता. प्रमुखासह शेकडो कार्यकर्त्यांचा मा. हितेंद्रजी ठाकूर ( आप्पा ) यांच्या उपस्थितीत ब. वि. आघाडी मध्ये जाहीर प्रवेश