शिवसेना ( उबठा ) गटाचे डहाणू ता. प्रमुखासह शेकडो कार्यकर्त्यांचा मा. हितेंद्रजी ठाकूर ( आप्पा ) यांच्या उपस्थितीत ब. वि. आघाडी मध्ये जाहीर प्रवेश
*शिवसेना ( उबठा ) गटाचे डहाणू ता. प्रमुखासह शेकडो कार्यकर्त्यांचा मा. हितेंद्रजी ठाकूर ( आप्पा ) यांच्या उपस्थितीत ब. वि. आघाडी मध्ये जाहीर प्रवेश*
१३ एप्रिल
पालघर ( एच. लोखंडे ) लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत, नगारे वाजत असतांना. दिनांक १३ एप्रिल २०२४ रोजी डहाणू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे डहाणू तालुका प्रमुख श्री अशोक भोईर त्यांच्यासह त्यांचे शेकडो समर्थक कार्यरते यांनी *बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा लोकनेते हितेंद्रजी ठाकूर*- आमदार विरार विधानसभा आणि वसई विरारशहर महानगर पालिकेचे प्रथम महापौर *राजीव पाटील ( नाना ) यांच्या प्रमुख उपस्थितीत बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला आहे.
यावेळी श्री. अशोक पाटील - यांनी प्रसिद्धी माध्यमाच्या प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले. मी बहुजन विकास आघाडीचे *मा. श्री. राजेश पाटील,आमदार - बोईसर विधानसभा, मा. श्री. क्षितीज ठाकूर - आमदार नालासोपारा विधानसभा आणि लोकनेते - हितेंद्रजी ठाकूर- ( आप्पा ) यांच्या, विधायक कार्यपद्धतीवर प्रेरित होऊन, ते करीत असलेल्या समाज सेवेच्या कार्यावर प्रेरित होऊन शेकडो कार्यकर्ते सह ( बविआ) केला असल्याचे बोलताना सांगितले*.
लोकनेते मा. श्री. हितेंद्रजी आणि मान्यवर यांच्या उपस्थितीत श्री. अशोक पाटील - यांची बहुजन विकास आघाडीच्या पालघर जिल्हा उपाध्यक्ष पदी तर श्री. अभिजीत देसक यांची - जिल्हा युवा उपाध्यक्ष, आदिवासी सेल पदी नियुक्ती करण्यात आली आहे तर श्री. सुरेश पाडवी यांची - पालघर विधानसभा अध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली आहे. तसेच यावेळी चंदू धांगडा, चंदू करमोडा, सुनील गांगडे, जयवंत का, सुदाम धांगडा, लहानु भोवर, राहुल बालोडा, राहुल बसवत, अजय धडपड, अशोक वाडिया या प्रमुख कार्यकर्ते सह शेकडो युवकांनी शिव बंधन तोडून बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला. त्या सर्वांच मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे.
यावेळी मान्यवरासह बहुजन विकास आघाडीचे श्री. संतोष बुकले- उपाध्यक्ष, श्री. अरूण निकोले - डहाणू ता. अध्यक्ष, श्री. प्रसाद पऱ्हाड - आदिवासी सेल युवा अध्यक्ष, श्री. मलावकर - मॅडम - माजी. जि. प. सदस्या, श्री. रणधीर कांबळे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment