केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

*केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात*.
७ एप्रिल
सफाळे  ( एच. लोखंडे ) पालघर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने, व मा. श्री. बाळासाहेब पाटील - पो. अधिक्षक पालघर यांच्या सुचनेनुसार त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक पोलीस ठाण्याच्यां अंतर्गत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, विशेषतः रात्रीच्यावेळी गस्तीवर असताना, सावधानता बाळगावी आदेशानुसार, दिनांक ५ एप्रिल २०२४ रोजी केळवा सागरी पोलीस ठाणे प्रभारी पोलीस अधिकारी श्री. दत्ता शेळके सहा पो. निरीक्षक आणि सहकारी अंमलदार रात्रीच्या गस्तीवर असताना. केळवा सागरी पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या मौजे. माकुणसार ता. जि. पालघर येथील प्रसिद्ध असलेल्या  ब्राह्मणदेव मंदिराच्या समोरील रूपेश पाटील यांच्या घराच्या पाठिमागे असलेल्या चिंचेच्या झाडाखाली, स्वताच्या फायद्यासाठी, कोणत्याही प्रकारची कायदेशीर परवानगी नसतांना, बेकायदेशीर पणे पैसे लावून जुगार खेळणे सुरू असल्याची माहिती मिळून आली असताना. लगेच आपल्या कर्मचारी सहा अचानक धाड टाकली असताना. जुगार खेळणारे जुगारी आणि जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणारे पत्ते, रोख रक्कम, जुगारी यांच्या आजूबाजूच्या परिसरातील पार्क केलेल्या वेगवेगळ्या कंपनी च्या मोटरसायकली आदी मुद्देमाल आढळून आला असताना, पोलीसांनी जुगारी आणि मुद्देमाल ताब्यात घेतला असून तो खालील प्रमाणे. 
             पोलीसांनी जागेवर ६ जुगारी ताब्यात घेतलेले तर संधीचा फायदा घेऊन पसार झालेले ५ जुगारी यांनाहि नंतर ताब्यात घेतले आहे. एकुण ११ जगारी आणि जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणारे पत्ते ( २ कॅट ) रोख रक्कम ( रूपये - ५००, / २००,/ १००,/२०, /१०, ) किंमतीच्या भारतीय चलनी नोटा. अंदाजे किंमत ११,२३०/- रूपये. तसेच वेगवेगळ्या कंपनीचे महागडे मोबाईल, जुगार खेळण्याच्या ठिकाणी मिळून आलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या एकूण ८ मोटारसायकलीं, असा अंदाजे एकुण ५,९६,२३० /- रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला असून जुगर खेळणारे आरोपी यांच्या वर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ चे कलम ( १२ - अ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी पालघर यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

Comments

Popular posts from this blog

शिवसेना ( उबठा ) गटाचे डहाणू ता. प्रमुखासह शेकडो कार्यकर्त्यांचा मा. हितेंद्रजी ठाकूर ( आप्पा ) यांच्या उपस्थितीत ब. वि. आघाडी मध्ये जाहीर प्रवेश

मोठा अपघात! मुंब्रा येथे ट्रेनमधून ट्रॅकवर पडून 5 प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जखमी