केळवेत अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमध्ये संताप; चौकशीची मागणी

केळवेत अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमध्ये संताप; चौकशीची मागणी
 पालघर (प्रतिनिधी): केळवे येथील करंद आळी परिसरातील रहिवासी श्री. विपिन दत्तात्रेय सावे (वय ५१) यांचे सोमवारी (दि. १ जून २०२६) रात्री अपघाती निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केळवे येथील संजीवनी मिठागर परिसरात मोरीचे काम सुरू आहे. या ठिकाणी कोणतेही इशारा फलक, प्रतिबंधक बोर्ड किंवा सुरक्षिततेसंदर्भातील व्यवस्था करण्यात आली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. रात्री कामावर जात असताना विपिन सावे यांचा या ठिकाणी अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत, याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. तसेच संबंधित कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळेच हा अपघात घडल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू असून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाची अधिकृत चौकशी झाल्यानंतरच अपघाताची नेमकी कारणे स्पष्ट होणार आहेत.
अंत्ययात्रा :
स्व. विपिन दत्तात्रेय सावे यांची अंत्ययात्रा मंगळवार, दि. २ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या केळवे येथील करंद आळी येथील निवासस्थानातून निघणार आहे.
त्यांच्या पश्चात वडील दत्तात्रेय बाबूराव सावे, पत्नी आरती सावे, मुलगा प्रीत सावे तसेच इतर आप्तस्वकीय असा परिवार आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली. 💐

Comments

Popular posts from this blog

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

शिवसेना ( उबठा ) गटाचे डहाणू ता. प्रमुखासह शेकडो कार्यकर्त्यांचा मा. हितेंद्रजी ठाकूर ( आप्पा ) यांच्या उपस्थितीत ब. वि. आघाडी मध्ये जाहीर प्रवेश