मायखोप येथे मसाला प्रोसेसिंग युनिटचे भूमिपूजन संपन्नग्रामीण महिलांना रोजगार व व्यवसायाची नवी संधी मिळणार

मायखोप येथे मसाला प्रोसेसिंग युनिटचे भूमिपूजन संपन्न
ग्रामीण महिलांना रोजगार व व्यवसायाची नवी संधी मिळणार
केळवे रोड,,(प्रतिनिधी )दि. २२ : महाराष्ट्र राज्य जीवन उन्नती अभियान (उमेद) अंतर्गत ग्रामीण महिलांना रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मायखोप येथे अंकुर सृष्टी महिला फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या मसाला प्रोसेसिंग युनिटचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला.
ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांना स्वयंरोजगाराची दिशा मिळावी यासाठी सो. हर्षला विनोद गावड यांच्या अथक प्रयत्नातून या मसाला प्रोसेसिंग युनिटची उभारणी करण्यात येत आहे.
या भूमिपूजन सोहळ्याला मसाला प्रोसेसिंग युनिटचे संचालक मंडळ, मायखोप ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. स्वप्नील भोईर, सामाजिक कार्यकर्ते श्री. दत्ता भोईर, श्री. विनोद गावड, प्रकल्प अधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भूमिपूजन कार्यक्रमानंतर संचालक मंडळाच्या वतीने कंपनीच्या उभारणीसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी सरपंच श्री. बाबुराव कृष्ण गावड यांचे विशेष आभार मानण्यात आले.
या मसाला प्रोसेसिंग युनिटमुळे मायखोप व परिसरातील ग्रामीण महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊन महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

केळवेत अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमध्ये संताप; चौकशीची मागणी

शिवसेना ( उबठा ) गटाचे डहाणू ता. प्रमुखासह शेकडो कार्यकर्त्यांचा मा. हितेंद्रजी ठाकूर ( आप्पा ) यांच्या उपस्थितीत ब. वि. आघाडी मध्ये जाहीर प्रवेश