एडवण येथे दुर्गा सॉ मिलचे उद्घाटन उत्साहात संपन्न
एडवण येथे दुर्गा सॉ मिलचे उद्घाटन उत्साहात संपन्न.
सफाळे, २६ जून (प्रतिनिधी)
सफाळे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या एडवण, ता. जि. पालघर येथे दुर्गा सॉ मिलचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
सफाळे परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच गोरगरीब नागरिकांच्या मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेणारे सरावली येथील श्री. रघुनाथ र. पाटील यांनी सुमारे २० ते २५ वर्षांपूर्वी स्वकष्टाने आणि मेहनतीने लाकूड व्यवसायाची सुरुवात केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा व्यवसाय आता मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे.
दुर्गा सॉ मिलच्या उद्घाटन प्रसंगी सहाय्यक उपवनसंरक्षक श्री. सानप साहेब, सफाळेच्या परिक्षेत्र वनाधिकारी सौ. वैद्य मॅडम, निवृत्त परिक्षेत्र वनाधिकारी सौ. संखे मॅडम, सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रभाकर पाटील (नाना) एडवण, माजी पंचायत समिती सभापती श्री. सुरेश तरे, माजी आमदार श्री. अविनाश सुतार तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, नातेवाईक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी श्री. रघुनाथ पाटील यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने गणपती पूजन व लाकूड कटाई मशीनचे पूजन मंत्रोच्चारात करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी श्री. पाटील यांना नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.
स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर उभा केलेला व्यवसाय पुढील काळातही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
Comments
Post a Comment