अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी, मा.राजेंद्र गावीत आमदार यांच्या कडून शेतकऱ्यांना दिलासा.
अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी, मा.राजेंद्र गावीत आमदार यांच्या कडून शेतकऱ्यांना दिलासा.
३० ऑक्टोबर
पालघर ( एच लोखंंडे ) डहाणू तालुक्यातील सारणी, म्हसाड, दाभोण, ऐना, रणकोळ आणि उर्से या गावांमध्ये अलीकडील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर या.श्री. राजेंद्र गावित आमदार पालघर विधानसभा यांनी या गावांचा पाहणी दौरा करून शेतकऱ्यांची स्थिती जाणून घेतली आणि त्यांना दिलासा दिला.
यावेळी पाहणी दौऱ्यात आमदार गावित यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत प्रशासनाला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात शासन त्यांच्या पाठीशी ठाम उभे आहे. सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना मदतीचा लाभ लवकरात लवकर मिळेल.”
सदर शेती नुकसान पाहणीसाठी डहाणू तालुक्यातील गटविकास अधिकारी मा. पल्लवी सस्ते, नायब तहसीलदार लीना पाटील, कृषी अधिकारी अनिल नरगुलवार मंडळ अधिकारी देविदास चौरे, कृषी विस्तार अधिकारी, माजी सभापती पिंटू गहला, लोकनियुक्त सरपंच अभिजित देसक, सरपंच वनिता करमोडा, सारणी उपसरपंच गणेश ठाकरे, उर्से उपसरपंच प्रसाद पाटील माजी सरपंच निलेश फासाला, अंकुश गहाला तसेच सामाजिक कार्यकर्ते आकाश वावरे उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन,अडचणी प्रत्यक्ष पाहून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी त्वरित मदतीचा निर्धार केल्याने स्थानिकांमध्ये काहीसा दिलासा निर्माण झाला आहे.
Comments
Post a Comment