पालघर जिल्हा महिला काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्षा सीमा पोतदार यांचा सत्कार।
पालघर जिल्हा महिला काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्षा सीमा पोतदार यांचा सत्कार।
बोईसर (प्रतिनिधी): बुधवारी, २९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता बोईसर-चित्रालय येथील हॉटेल सरोवरमध्ये पालघर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या नवनियुक्त अध्यक्षा सौ. सीमा पोतदार यांचा काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.या प्रसंगी सौ. पोतदार यांना शॉल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि पेन देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाला पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अरविंदसिंह क्षत्रिय, जिल्हा महासचिव रामप्रकाश निराला व प्रकाश संखे, माजी महासचिव मनोज पाटील, सचिव रामनरेश यादव, पालघर शहर उपाध्यक्षा मनीषा कालपुंड, अमरेंद्र शुक्ला तसेच प्रदीप कात्यान यांच्यासह अनेक पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांग्रेसचे जिल्हा महासचिव रामप्रकाश निराला यांनी केले. या वेळी उपस्थित काँग्रेस नेत्यांनी सौ. सीमा पोतदार यांना त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पालघर जिल्ह्यातील महिला काँग्रेस अधिक संघटित, मजबूत आणि प्रभावी बनेल असा विश्वास व्यक्त केला.
सत्कारानंतर आपल्या मनोगतामध्ये सत्कारमूर्ती सौ. सीमा पोतदार म्हणाल्या की, महिला काँग्रेस ही केवळ संघटना नाही, तर समाजातील प्रत्येक स्त्रीच्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. महिलांना राजकारण, शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात अधिक संधी मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू. पालघर जिल्ह्यातील प्रत्येक गावात महिला काँग्रेसचा झेंडा फडकवणे हे माझे ध्येय आहे. आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी हातात हात घालून महिलांच्या हक्कांसाठी, समाजाच्या प्रगतीसाठी आणि काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी एकत्र काम करूया.त्यांनी पुढे सांगितले की काँग्रेस पक्षाने नेहमीच समानता, स्वातंत्र्य आणि न्याय या मूल्यांना प्राधान्य दिले आहे. या मूल्यांवर आधारित कार्य करून आपण पालघर जिल्हा महिला काँग्रेसला नवी दिशा देऊ. माझा सत्कार करून मला नवी ऊर्जा आणि प्रेरणा दिल्याबद्दल मी सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानते.कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण होते. शेवटी सर्व उपस्थितांनी “जय काँग्रेस, जय महिला काँग्रेस” च्या घोषणां देऊन कार्यक्रमाचा समारोप केला.
Comments
Post a Comment