वंदे मातरम्" गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रम.
*"वंदे मातरम्" गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रम*
दिनांक: 07 नोव्हेंबर 2025
तलासरी:(प्रतिनिधी) कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग व सांस्कृतिक विभागाच्या पुढाकाराने तसेच ITI तलासरी यांच्या संयुक्त विद्यमाने "वंदे मातरम्" गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रम महाविद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, स्थानिक नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली.
सर्वप्रथम दीपप्रज्वलन व भारत माता आणि कॉम्रेड गोदावरी परुळेकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.त्यानंतर वंदे मातरम् संदर्भात एक लघू नाटिकेची चित्रफित दाखविण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात मा. अमोल पाठक (तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी तलासरी) यांच्या अध्यक्षीय भाषणांनी झाली . त्यामध्ये त्यांनी वंदे मातरम विषयी थोडक्यात मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे डॉ. भगवान राजपूत, प्राचार्य, गोदावरी परुळेकर महाविद्यालय, व प्रमुख वक्ते डॉ. मनिष देशमुख यांनी विद्यार्थ्यांना "वंदे मातरम्" या गीताचा जन्म, ऐतिहासिक पार्श्वभूमी तसेच स्वातंत्र्यलढ्यातील त्याचे प्रेरणास्थान याबद्दल सखोल माहिती दिली.
१८७५ मध्ये बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी रचलेल्या या गीताने भारतीयांमध्ये देशप्रेम, स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची जागरूकता निर्माण केली, हे विशेषत्वाने अधोरेखित करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आणि उपस्थितांनी वंदे मातरम् चे सामूहिक गायन केले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी NSS विभाग, सांस्कृतिक विभाग व विद्यार्थी प्रतिनिधी तसेच ITI तलासरीच्या च्या टीमने परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे तसेच ITI आयटीआय प्रशिक्षण केंद्राचे 180 हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री. संखे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. आणि कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीताने करण्यात आली.
Comments
Post a Comment