हौशी कलाकारांचा रंगोत्सव — मुंबईत सुरू झाली ६४ वी मराठी राज्य नाट्यस्पर्धा.

*हौशी कलाकारांचा रंगोत्सव — मुंबईत सुरू झाली ६४ वी मराठी राज्य नाट्यस्पर्धा*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा काल माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात उद्घाटन सोहळ्यानिशी सुरू झाली. स्पर्धेचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेते नारायण जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

३ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२५ या कालावधीत दररोज सकाळी ११:३० आणि संध्याकाळी ७ वाजता नाटके रंगभूमीवर सादर केली जाणार आहेत.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, हौशी रंगकर्मींसाठी ही स्पर्धा एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार असून मराठी रंगभूमीच्या परंपरेला नवसंजीवनी देणारी ठरेल.

मुंबई केंद्रावर १९ नाटके सादर होणार असून परीक्षक म्हणून चंद्रकांत जाडकर, विनिता पिंपळखरे आणि राहुल वैद्य काम पाहत आहेत. राज्यातील सर्व केंद्रांवर मिळून एकूण ५४० संघ या वर्षी सहभागी झाले आहेत.

प्रेक्षकांनी या हौशी कलाकारांच्या सादरीकरणांना उपस्थित राहून त्यांच्या कलाविष्काराचा आनंद घ्यावा आणि त्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

मराठी नाट्यसंस्कृतीचा समृद्ध वारसा जपणारी आणि नव्या पिढीतील कलाकारांना प्रोत्साहन देणारी ही राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा, रसिकांसाठी एक अविस्मरणीय रंगोत्सव ठरणार आहे.

Comments

Popular posts from this blog

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

शिवसेना ( उबठा ) गटाचे डहाणू ता. प्रमुखासह शेकडो कार्यकर्त्यांचा मा. हितेंद्रजी ठाकूर ( आप्पा ) यांच्या उपस्थितीत ब. वि. आघाडी मध्ये जाहीर प्रवेश

मोठा अपघात! मुंब्रा येथे ट्रेनमधून ट्रॅकवर पडून 5 प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जखमी