पालघर जिल्ह्यातील अखिल गोवर्धन ब्राम्हण संघांचा एकत्रित दीपोत्सव सोहळा आलेवाडी ,नांदगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा.
पालघर जिल्ह्यातील अखिल गोवर्धन ब्राम्हण संघांचा एकत्रित दीपोत्सव सोहळा आलेवाडी ,नांदगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा.
दीपदान, त्रिपुरासुर दहन, तुळशी विवाह आणि ज्येष्ठ नागरिक सत्कार या कार्यक्रमांनी रंगला भव्य सोहळा
आलेवाडी (वार्ताहर) :
पालघर जिल्ह्यातील सर्व ब्राम्हण संघटनांचा एकत्रित दीपोत्सव सोहळा अखिल गोवर्धन ब्राम्हण संघ, आलेवाडी यांच्या पुढाकाराने मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.पालघर तालुक्यातील आलेवाडी गावातील तलावाजवळील परिसरात पारंपरिक पद्धतीने हा सोहळा पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात मंगल वादन, श्री गणेश व श्री लक्ष्मी पूजन, तसेच दीपप्रज्वलनाने झाली. आलेवाडी परिसर सुंदर फुलांच्या आरासे, रांगोळ्या आणि लखलखत्या दिव्यांनी सजवण्यात आला होता. संध्याकाळी आयोजित दीपदान सोहळ्यात असंख्य दिव्यांच्या प्रकाशाने तलाव परिसर उजळून निघाला आणि भक्तिभावाने वातावरण भारावून गेले.
यानंतर पौराणिक परंपरेनुसार त्रिपुरासुर दहनाचा विधी पार पडला. चांगल्याचा वाईटावर विजय या प्रतीकात्मक कार्यक्रमाने उपस्थितांना प्रेरणादायी संदेश मिळाला. तुळशी विवाह सोहळा अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत तुळशी-विष्णू विवाह विधी पार पाडून सर्वांना आनंदमग्न केले.
कार्यक्रमात लहान मुलांनी देखील सहभाग घेतला. सादर केलेल्या सांस्कृतिक पद्धतीने तरुणाईने व जेष्ठ नागरिकांनी संस्कृतीप्रधान गीतांनी कार्यक्रमाला रंगत आणली. महिलांनी दीप आरास एकदम अनोखी पद्धतीने तसेच पारंपरिक उत्सव अधिक आकर्षक बनवला.
या प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह व दीपदान देऊन सत्कार करण्यात आला. समाजातील कार्यकर्त्यांच्या योगदानाचा गौरव करत त्यांच्या अनुभवाचा आदर व्यक्त करण्यात आला.तसेच आयोजक प्रशांत सु .नाईक ह्यांचा जन्मदिवस देखील आज साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी एकत्र येऊन दीप प्रज्वलन करून “एक दीप संस्कृतीसाठी, एक दीप समाज ऐक्यासाठी” हा संदेश दिला. आलेवाडी तलाव परिसर या तेजोत्सवामुळे उजळून निघाला.
या भव्य सोहळ्याचे आयोजन अखिल गोवर्धन ब्राम्हण संघ, आलेवाडी यांच्या पदाधिकारी, महिला मंडळ, युवक मंडळ आणि पालघर जिल्ह्यातील विविध ब्राम्हण संघटनांनी संयुक्तरीत्या केले. अखिल भारतीय गोवर्धन ब्राह्मण संघाचे पदाधिकारी, श्री अजित राणे, श्री प्रशांत नाईक, बोईसर ब्राह्मण संघाचे अध्यक्ष श्री प्रभाकर दीक्षित, वृंदा कुलकर्णी, तसेच पदाधिकारी उपस्थित होते. समाजातील सर्व घटकांच्या सहकार्यामुळे हा दीपोत्सव सोहळा अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.
Comments
Post a Comment