कांद्रेभुरे ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्ता ते सावरपाडा - भुरे पाडा रस्त्यासाठी वनजमिन परिवर्तन.

कांद्रेभुरे ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्ता ते सावरपाडा - भुरे पाडा रस्त्यासाठी वनजमिन परिवर्तन.

६ नोव्हेंबर 
सफाळे ( एच लोखंंडे ) ग्रामपंचायत कांद्रेभुरे ता. जि. पालघर ( सफाळे पश्चिम ) या   ग्रामपंचायत हद्दीतील कांद्रेभुर मुख्य रस्ता ते सावरपाडा - भुरे पाडा येथील स्थानिक नागरिक यांना जाण्या येण्यासाठी असलेला रस्ता हा वनविभागाच्या मालकी जमीन असलेल्या भागातून असल्याने सदर रस्त्यावर खडीकरण डांबरीकरण कॉक्रटीकरण करण्यासाठी अनेक कायदेशीर मान्यता मिळत नव्हत्या, परंतु या मान्यता मिळण्यासाठी व वनविभागाच्या ताब्यातील - मालकी जमीन. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वनवासी (वनहक्कांची मान्यता) मिळण्यासाठी श्री.जगदिश पाटील ग्रामपंचायत कांद्रेभुरे माजी सरपंच तथा माजी पालघर जिल्हा नियोजन सदस्य यांनी आपल्या कार्यकाळात ठरावाला मान्यता मिळवून व त्यानंतरही कांद्रेभुरे ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने वेळोवेळी ग्रामपंचायत कार्यालयातून रस्त्याच्या जागेचा ३/२ चा ग्रामसभेत ठरावची मागणी करून मान्यता मिळाली होती.
          सदर  रस्त्याच्या जागेची  मंजुरी उपवनसंरक्षक डहाणू मिळाण्यासाठी सदर २/३  चा प्रस्ताव सफाळे वनसंरक्षक अधिकारी व उप वनरक्षक डहाणू वनविभाग डहाणू कार्यालय येथे (वाढीव) सरावली ता.जि.पालघर येथील  जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. रघुनाथ र. पाटील ( रघुदा ) यांच्या वेळोवेळी मिळत असलेल्या सहकार्याने सावरपाडा - भुरेपाडा रस्त्यासाठी पाठपुरावा करीत होते. तसेच मा. तहसीलदार पालघर, मा. जिल्हाधिकारी पालघर यांच्या कार्यालयात कागदपत्रे देऊन रस्त्यांसाठी पाठपुरावा करीत होते.
       पालघर येथील जनता दरबारात  आलेले, पालघर जिल्हा पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्य वन मंत्री  मा. *श्री. गणेश नाईक साहेब* यांना रस्त्याचे जागेचा ३/२ चा प्रस्ताव देऊन जागेची मागणी केला होती. 
     या अनुषंगाने रस्त्याच्या जागेची ३/२ च्या प्रस्तावाची संपूर्ण कागदोपत्री पूर्तता होऊन  दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी - उपवनसंरक्षक डहाणू, वनविभाग डहाणू यांच्या कार्यालया कडून ( आदेश जा.क्र. ब/ २० / जमिन/ २७७४ / सन २०२५ - २६ ) काही अटी व शर्तीनुसार सर्वे. न.१५४ ( ग.न.६८० ) (क.क्र. ११८ ) मधील ९०×०३=२७०चौरस मीटर जागा देण्यात आली आहे. असलेल्याचे श्री .एन एस दिवाकर - उपवनसंरक्षक - डहाणू वनविभाग डहाणू यांच्या सहिचे लेखी पत्र मा. ग्रामविकास अधिकारी,ग्रा.पं. कांद्रेभुरे यांच्या वतीने श्री. रघुनाथ पाटील व श्री जगदिश पाटील यांनी सफाळे वनसंरक्षक अधिकारी वैद्य मॅडम यांच्या कडून दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ रोजी स्विकारले आहे.
      सदर जमीन रस्त्यासाठी मिळवून देण्यासाठी मा. श्री. गणेश नाईक पालघर जिल्हा - पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्य वनमंत्री यांचे मोलाचे सहकार्य लाभले तर सौ मनिषा ताई निमकर - माजी राज्यमंत्री यांनी वेळोवेळी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मिळालेले मार्गदर्शन व सहकार्याने हे कार्य यशस्वी झाले आहे.
     श्री. रघुनाथ पाटील - सामाजिक कार्यकर्ते तसेच सफाळे वनपरिक्षेत्र अधिकारी, डहाणू उपवन संरक्षक अधिकारी याचे मिळालेले सहकार्याने अंदाजे ५० वर्षांपासून कांद्रेभुरे मुख्य रस्ता ते सावरपाडा - भुरे पाडा सिमेंट कांक्रेटीकरण रखडले काम पूर्ण होण्यासाठी अडथळा दूर झालेला आहे. यामुळे सावरपाडा - भूरेपाडा येथील स्थानिक आनंदी झाले आहे.

Comments

Popular posts from this blog

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

शिवसेना ( उबठा ) गटाचे डहाणू ता. प्रमुखासह शेकडो कार्यकर्त्यांचा मा. हितेंद्रजी ठाकूर ( आप्पा ) यांच्या उपस्थितीत ब. वि. आघाडी मध्ये जाहीर प्रवेश

मोठा अपघात! मुंब्रा येथे ट्रेनमधून ट्रॅकवर पडून 5 प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जखमी