मा. सुहास राऊत यांना 'भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल- हिंदूरत्न पुरस्कार '
मा. सुहास राऊत यांना 'भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल- हिंदूरत्न पुरस्कार '
चिंचणी (प्रतिनिधी) पालघर जिल्ह्यातील चिंचणी, गावातील श्री. सुहास परशुराम राऊत यांना साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक वाटचालीनिमित्त पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट - निती आयोग संलग्नीत संस्थेच्या वतीने भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल- हिंदूरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार, अपंग सेवक आणि या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष - डॉ. रवींद्र भोळे यांच्या आरोग्य सेवा केंद्र- उरळी कांचन यांच्या सहकार्याने हा पुरस्कार दिला जातो.
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त व राष्ट्रीय एकात्मता दिनाचे औचित्य साधून दि. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन, येरवडा- पुणे या ठिकाणी हा सोहळा संपन्न झाला. मा. नामदार राधाकृष्ण विखे पाटील- जलसंपदा मंत्री, तसेच पुणे जिल्ह्याच्या खासदार मा. सौ. मेधाताई कुलकर्णी आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदूरत्न पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
Comments
Post a Comment