प्रा. सुनील देवचंद बैसाणे यांची प्राचार्य पदी नियुक्ती ...

प्रा. सुनील देवचंद बैसाणे यांची प्राचार्य पदी नियुक्ती ...

चिंचणी (प्रतिनिधी)
चिंचणी तारापूर शिक्षण संस्था के.डी. हायस्कूल व एम.के. जूनियर कॉलेजच्या प्राचार्य पदी प्रा. सुनील बैसाणे यांची नियुक्ती करण्यात आली. ते कॉमर्सचे पदव्युत्तर पदवीधर असून अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन रजनीकांत भाई श्राॅफ, संस्थेच्या सदस्या डॉ. रमिलाबेन श्राॅफ, संस्थेचे सदस्य महेश पाटील व मावळते प्राचार्य महेश रावते उपस्थित होते.
 यापूर्वी त्यांची सेवा जेष्ठतेनुसार कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य, शाळेचे उपमुख्याध्यापक, म्हणून कामकाज केले आहे. त्यांनी त्यांच्या सेवेत कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे सचिव, कार्याध्यक्ष म्हणून ही कामकाज पाहिले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचे विभागीय शिक्षण मंडळ रत्नागिरी येथे अशासकीय सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. ते अभ्यासू व्यक्तिमत्व असून प्रशासकीय व व्यवस्थापकीय अनुभवाचा फायदा विद्यार्थी, शिक्षण संस्थेला होईल. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे..

Comments

Popular posts from this blog

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

शिवसेना ( उबठा ) गटाचे डहाणू ता. प्रमुखासह शेकडो कार्यकर्त्यांचा मा. हितेंद्रजी ठाकूर ( आप्पा ) यांच्या उपस्थितीत ब. वि. आघाडी मध्ये जाहीर प्रवेश

मोठा अपघात! मुंब्रा येथे ट्रेनमधून ट्रॅकवर पडून 5 प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जखमी