सरपंच परिषदेचे अध्यक्ष किशोर कडू यांचा लालबावटा पक्षात प्रवेश; बावडा ग्रामपंचायतमध्ये राजकीय भूकंप

सरपंच परिषदेचे अध्यक्ष किशोर कडू यांचा लालबावटा पक्षात प्रवेश; बावडा ग्रामपंचायतमध्ये राजकीय भूकंप 
डहाणू/ प्रसाद भालेराव 
       तालुक्यातील राजकीय समीकरणांना हादरा देणारी घटना घडली आहे. बावडा ग्रामपंचायतीचे विद्यमान  सरपंच तसेच डहाणू सरपंच परिषदेचे अध्यक्ष किशोर कडू यांनी औपचारिकरित्या भारताचा मार्क्सवादी (लेनिनवादी) लाल बावटा पक्षात निकने ग्रामपंचायतीवर आयोजित केलेल्या आंदोलनादरम्यान जाहीर पक्षप्रवेश केला आहे.                                         
या पक्षप्रवेश सोहळ्यात ग्रामपंचायतीतील सदस्य भरत तांडेल सह गावातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्वांनी एकमुखाने लाल बावट्याच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश केला.या निमित्ताने परिसरात उत्साह आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे. सरपंच
किशोर कडू यांनी या वेळी सांगितले की, "गावपातळीवर  खऱ्या अर्थाने कष्टकरी जनतेच्या प्रश्नांसाठी लढा देणारा पक्ष म्हणजे माक्सऺवादी (लेनिनवादी) लाल बावटा पक्ष. जनतेचे हक्क आणि न्याय मिळवण्यासाठी आम्ही संघटित लढा उभारणार आहोत," असे ठाम वक्तव्य त्यांनी केले.
विश्वसनीय सूत्रांनुसार, येत्या काही दिवसांत बावडा ग्रामपंचायत तसेच इतर ग्रामपंचायत  क्षेत्रातील आणखी अनेक कार्यकर्ते  मोठ्या संख्येने लाल बावटा पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
 त्यामुळे आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
      बावड्यातील या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची निर्मिती होणार असून, पारंपरिक सत्ताधाऱ्यांच्या चिंतेत निश्चितच वाढ झाली आहे. "जनतेचा आवाज बुलंद करणार, लढा उभारणार!"  लाल बावट्याखाली नव्या राजकीय युगाची सुरूवात झाली आहे.असे पालघरजिल्हा सहसचिव कॉम्रेड. शेरू वाघ यांनी सांगितले आहे.

Comments

Popular posts from this blog

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

शिवसेना ( उबठा ) गटाचे डहाणू ता. प्रमुखासह शेकडो कार्यकर्त्यांचा मा. हितेंद्रजी ठाकूर ( आप्पा ) यांच्या उपस्थितीत ब. वि. आघाडी मध्ये जाहीर प्रवेश

मोठा अपघात! मुंब्रा येथे ट्रेनमधून ट्रॅकवर पडून 5 प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जखमी