वार्षिक श्रीहरी महोत्सव.११५वा संपन्न.

*वार्षिक श्रीहरी महोत्सव.११५वा संपन्न.*

 पालघर(प्रतिनिधी)- दि..2..आज रोजी श्रीहरी मंदिराच्या 115 व्या वार्षिक श्रीहरी महोत्सवातील प्रकट कार्यक्रम श्री पद्मनाभ शिष्य सांप्रदाय श्री हरी मंदिर श्री क्षेत्र माकुणसार तालुका जिल्हा पालघर येथे दिनांक २ नोव्हेंबर रोजी गणेश स्तवनाने पहाटे पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत भक्ती भावाने साजरा झाला. यावेळी गुरुवर्य सांप्रदाय भारती, सांप्रदाय अध्यक्ष व विश्वस्त यांची खास उपस्थिती होती. 

पंधरावा श्रीहरी गौरव पुरस्कार श्री.कृष्णकांत स्वामी, तिसावा गुरुबंधू सेवा पुरस्कार श्री भालचंद्र पामाळे, ३१ वा गुरुबंधू सेवा पुरस्कार श्री पंढरी पाटील, 9 वा श्रीहरी लेखन गौरव पुरस्कार श्री सुधाकर ठाकूर, 9 वा श्रीहरी लेखन प्रोत्साहन पुरस्कार सौ दिपाली ठाकूर, 9 वा सद्गुरु सेवा पुरस्कार श्रीमती पद्मावती घरत. तसेच आय. के. गुप्ता परिवार मुंबई व सामाजिक कार्यकर्ते श्री आप्पा म्हात्रे या गुरुकुल दात्यांचा गौरव करण्यात आला. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री चिंतामण ठाकूर अध्यक्ष नर्मदा ज्येष्ठ नागरिक संघ, श्री संजय जी पाटील कामगार नेते, श्रीमती जयंती चुरी समाजसेविका, श्री मधुकर पाटील मुख्य प्रचारक, श्री प्रीतम म्हात्रे उपाध्यक्ष सोमवंशी क्षत्रिय  समाजोन्नती संघ, श्री अनिल पाटील अध्यक्ष, श्री रामकृष्ण पाटील माजी अध्यक्ष श्रीहरी मंदिर या मान्यवरांचे प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी प्रवचन, कीर्तन, अभिषेक पूजा आरती, हरिपाठ, पालखी सोहळा, महाप्रसाद, दिंडी सोहळा अशी भक्ती दिनचर्या संपन्न झाली.

 यावेळी लेखक संजय पाटील मायखोपकर लेखक  रमेश पाटील आगरवाडीकर,लेखिका स्मिता पाटील, कवी-विजय पुरव, साहित्यिक, पत्रकार, महाराष्ट्रातील भाविक भक्त गण यांनी श्रीहरी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. श्रीहरी मंदिर गेली 121 वर्षे  व्यसनमुक्तीचे कार्य करते व अन्नदान सेवेची 114 वर्षाची परंपरा आहे.

 स्मिता पाटील अध्यक्षा लेखन पुरस्कार समिती यांनी सेवा पुरस्काराचे वाचन केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ हर्षदा पाटील, श्री उमेश पाटील यांनी पाहुण्यांची ओळख  करून दिली. प्रास्ताविक सुनील पाटील यांनी केले या कार्यक्रमास पत्रकार जगन्नाथ पाटील उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

शिवसेना ( उबठा ) गटाचे डहाणू ता. प्रमुखासह शेकडो कार्यकर्त्यांचा मा. हितेंद्रजी ठाकूर ( आप्पा ) यांच्या उपस्थितीत ब. वि. आघाडी मध्ये जाहीर प्रवेश

मोठा अपघात! मुंब्रा येथे ट्रेनमधून ट्रॅकवर पडून 5 प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जखमी