हरवलेल्या व्यक्तीच्या शोध कामी, सफाळा,पो.ठाणे ता. जि. पालघर

*हरवलेल्या व्यक्तीच्या शोध कामी,  सफाळा,पो.ठाणे ता. जि. पालघर

४ नोव्हेंबर 
सफाळे ( एच लोखंंडे )  सदर फोटोत दिसत असलेली आणि वर्णन केलेली व्यक्ती एकच आहे.
       सफाळे पोलिस ठाणे हद्दीतील सेंट्रल पार्क माकणे - सफाळे पश्चिम ता. जि. पालघर येथे राहणारे श्री. जगदीप सुखदेव सिंग, वय: 32 वर्षे, पुरुषउंची: 5 फूट 10 इंच, रंग: गोरा, बांधा: सडपातळ. केसांचा रंग काळा व  बारीक केस. डोळ्यांचा रंग: काळा. उजव्या हातात स्टीलचा गोल कडा. समोरचा एक दात अर्धा तुटलेला. अंगावर आकाशी रंगाचा टी-शर्ट व चॉकलेटी रंगाची शॉर्ट पॅन्ट. पायात- काळ्या रंगाच्या चप्पला असलेली व्यक्ती.
          दिनांक  15/10/2025 रोजी, माकणे गाव, सेंट्रल पार्क, ता. व जि. पालघर येथून सकाळी 10:00 वाजता राहत्या घरातून कोणासही काही एक न सांगता निघून गेली आहे.  त्या नंतर सदर व्यक्ती विरार ता. वसई येथे एका मित्राला भेटली होती, या नंतर सदर व्यक्तीचा मोबाईल बंद आहे. अशी माहिती मिळून आली आहे.
          या संदर्भात सफाळे पोलिस ठाणे ता.जि.पालघर येथे १९ऑक्टोबर २०२५ रोजी हरवलेल्या व्यक्तीच्या नातेवाईक यांनी खबर दिली असताना मनुष्य मिसिंग रजिस्टर मध्ये  १९ /२०२५ ने सफाळे पोलिस ठाणे येथे नोंद करण्यात आली असून, पुढील तपास तपासणी अंमलात सफाळे पोलिस ठाणे करीत आहे.
       या संदर्भात कोणासही काही माहिती मिळून आली असताना, किंवा सदर व्यक्ती कुठेही आढळून आल्यास  कृपया  खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा, सफाळे पो.ठाणे प्रभारी पोलिस अधिकारी सफाळे  श्री दत्ता शेळके - सपोनि. 9923962304. 
 श्री.भरत भवर पोलीस नाईक सफाळे पोलीस ठाणे  7972321492

Comments

Popular posts from this blog

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

शिवसेना ( उबठा ) गटाचे डहाणू ता. प्रमुखासह शेकडो कार्यकर्त्यांचा मा. हितेंद्रजी ठाकूर ( आप्पा ) यांच्या उपस्थितीत ब. वि. आघाडी मध्ये जाहीर प्रवेश

मोठा अपघात! मुंब्रा येथे ट्रेनमधून ट्रॅकवर पडून 5 प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जखमी