1 मे पासून डहाणू ते वैतरणा १५ डब्याची लोकल धावली, पणं दैनंदिन रेल्वे प्रवाशांना केले निराश! श्री. केदार काळे

*1 मे पासून डहाणू ते वैतरणा  १५ डब्याची लोकल धावली, पणं दैनंदिन रेल्वे प्रवाशांना  केले निराश! श्री. केदार काळे
१ मे 
पालघर ( एच लोखंंडे ) १ मे २०२६  पासून पच्शिम रेल्वेने गाजावाजा केलेल्या १५  डब्याच्या चार जोड्या लोकल डहाणू ते वैतरणा दरम्यान रेल्वे स्टेशन वरून धावल्या, 
     गाडी नंबर 93202 डहाणू - अंधेरी लोकल सकाळी 7.17 डहाणू येथून तर, गाडी नंबर 93204 डहाणू -विरार लोकल डहाणू येथून दुपारी 1.20 ला आहे, गाडी नंबर 93206 डहाणू -विरार लोकल संध्याकाळी डहाणू येथून 5.10 वाजता तर, गाडी नंबर 93208 डहाणू- विरार रात्री 10.15 वाजता  तसेच गाडी नंबर 93201 विरार डहाणू लोकल पहाटे 5.15, तर विरार येथून गाडी नंबर 93203 चर्चगेट डहाणू लोकल चर्चगेट वरून सकाळी 10.3 ला सुटेल, गाडी नंबर 93205 विरार डहाणू लोकल विरार येथून दुपारी 3 ला  सुटेल, तर गाडी नंबर 93207 विरार डहाणू लोकल विरार येथून रात्री 8.30 वाजता सुटेल. 
           या लोकल सुटण्याच्या  वेळा  बघितल्या असता ,१) सकाळी डहाणू येथून 7.17 वाजता सुटणारी अंधेरी लोकल सोडल्यास उरलेल्या लोकल ह्या गर्दीच्या वेळेला नाहीत, पश्चिम रेल्वेने डहाणू, वाणगाव, बोईसर, उमरोळी, पालघर, केळवे रोड, सफाळे, वैतरणा हेतून रेल्वेने मुंबईकडे जाणाऱ्या येणाऱ्या दैनंदिन रेल्वे प्रवाशांची खरोखरच चेष्टाच केली आहे. १५ डब्याच्या लोकल सुरू होणार रेल्वेने तयारी पूर्ण केली अशा बातम्यांमुळे प्रवाशांना आनंद झाला होता , व आता तरी प्रवास थोडासा आरामदाय होईल ही आशा निर्माण झाली होती . पण पश्चिम रेल्वेने  डहाणू - विरार प्रवासी यांच्या आशेवर  अक्षरशा पाणी फिरले आहे.असे श्री.केदार काळे यांचे सांगणे आहे.
     श्री.केदार काळे - शिवसेना प्रवक्ते यांची, पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांना विनंती आहे गर्दीच्या वेळेस सकाळ, आणि संध्याकाळ  गर्दीच्या वेळेत ( पिकअप अवर मध्ये) चर्चगेट डहाणू व डहाणू चर्चगेट नवीन लोकल सुरू कराव्यात, त्यामुळे डहाणू  ते वैतरणा दरम्यान दैनंदिन प्रवासी करणारे यांना मुंबई वरून विरार येथे येऊन डहाणू लोकल पकडण्यासाठी होणारा त्रासही वाचेल.

Comments

Popular posts from this blog

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

मोठा अपघात! मुंब्रा येथे ट्रेनमधून ट्रॅकवर पडून 5 प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जखमी

शिवसेना ( उबठा ) गटाचे डहाणू ता. प्रमुखासह शेकडो कार्यकर्त्यांचा मा. हितेंद्रजी ठाकूर ( आप्पा ) यांच्या उपस्थितीत ब. वि. आघाडी मध्ये जाहीर प्रवेश