एचएसआरपी नंबर प्लेट्सची परस्पर विक्रीफसवणूक करणारा इन्चार्ज अटकेत

एचएसआरपी नंबर प्लेट्सची परस्पर विक्री
फसवणूक करणारा इन्चार्ज अटकेत

मुंबई प्रतिनिधी:(सतिश पाटील)

छत्रपती संभाजीनगर : वाहनांसाठी अनिवार्य असलेल्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटचा (एचए सआरपी) मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. एका सेंटर इन्चार्जने आरटीओ आणि कंपनीच्या डोळ्यात धूळ फेकत तब्बल ८०० हून अधिक नंबर प्लेट्सची परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिडको पोलिसांनी आरोपी नीलेश बबन तुपे (रा. मुकुंदवाडी) याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला १ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
एफटीए एचएसआरपी सोल्युशन्स प्रा. लि. कंपनीचे अधिकारी सचिन चोपडे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. नीलेश हा या कंपनीच्या शहरातील सेंटरचा इन्चार्ज होता. एका ग्राहकाने नंबर प्लेट लावूनही आरसी बुक न मिळाल्याची तक्रार कंपनीकडे केली. यावरून अंतर्गत चौकशी केली असता, तब्बल ८०० नंबर प्लेट्सचा हिशेब लागत नसल्याचे समोर आले.
नीलेश सेंटरमध्ये येणाऱ्या कोऱ्या एचएसआरपी प्लेट्सवर ग्राहकांच्या वाहनांचा क्रमांक टाकून त्यांना विकायचा. मात्र याची कोणतीही नोंद तो कंपनीच्या किंवा आरटीओच्या सिस्टीममध्ये करत नव्हता. नोंदणी न करता प्लेट्स विकून त्याने हजारो रुपये स्वतःच्या खिशात घातले. या बोगस प्लेट्स लावलेली शेकडो वाहने सध्या शहरात बिनधास्त फिरत असल्याने सुर-क्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कंपनीचे ऑडिट सुरू असून, या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता हवालदार भाऊसाहेब जगताप यांनी व्यक्त केली आहे.

Comments

Popular posts from this blog

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

मोठा अपघात! मुंब्रा येथे ट्रेनमधून ट्रॅकवर पडून 5 प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जखमी

शिवसेना ( उबठा ) गटाचे डहाणू ता. प्रमुखासह शेकडो कार्यकर्त्यांचा मा. हितेंद्रजी ठाकूर ( आप्पा ) यांच्या उपस्थितीत ब. वि. आघाडी मध्ये जाहीर प्रवेश