को.म.सा.प. पालघर शाखेचा वर्धापन दिन सोहळा दिमाखात संपन्न

को.म.सा.प. पालघर शाखेचा वर्धापन दिन सोहळा दिमाखात संपन्न

सफाळे, (प्रतिनिधी)दि. १ : सफाळे येथील देवभूमी सभागृहात कोकण मराठी साहित्य परिषद (को.म.सा.प.) पालघर शाखेचा वर्धापन दिन सोहळा अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा. संध्या शहापुरे, प्रा. अशोक ठाकूर, अध्यक्ष प्रवीण दवणे तसेच को.म.सा.प. पालघर जिल्हाध्यक्ष आणि शाखाध्यक्षा प्रा. स्मिता पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालघर शाखेची स्थापना करून तिचे संवर्धन करणाऱ्या सर्व माजी अध्यक्षांचा मानपत्र, ग्रंथ आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यामुळे उपस्थितांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रसंगी पालघर शाखेच्या ‘युवा शक्ती’ उपक्रमांतर्गत ‘निखिल राजन घरत विद्यालय’च्या विद्यार्थिनींनी समूहगीत आणि कविता सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. तसेच दिनेश तारवी यांच्या सौजन्याने साहित्यिक संजय पाटील मायखोपकर यांच्या हस्ते विद्यार्थिनींना ग्रंथ भेट देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव सौ. अमृता सावे यांनी सुरेखरीत्या केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. अशोक वर्तक, सौ. स्वेजल म्हात्रे, उज्वला वैद्य, विनय पाटील, प्रकाश वैद्य, नामदेव कवळे, स्वाती भोईर तसेच सर्व कार्यकारिणी सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.
एकूणच हा वर्धापन दिन सोहळा साहित्यप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरला.

Comments

Popular posts from this blog

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

मोठा अपघात! मुंब्रा येथे ट्रेनमधून ट्रॅकवर पडून 5 प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जखमी

शिवसेना ( उबठा ) गटाचे डहाणू ता. प्रमुखासह शेकडो कार्यकर्त्यांचा मा. हितेंद्रजी ठाकूर ( आप्पा ) यांच्या उपस्थितीत ब. वि. आघाडी मध्ये जाहीर प्रवेश