उमरोली येथे बौद्ध पौर्णिमेनिमित्त नवीन बौद्ध विहाराचे भव्य उद्घाटन

उमरोली येथे बौद्ध पौर्णिमेनिमित्त नवीन बौद्ध विहाराचे भव्य उद्घाटन
उमरोली (ता. पालघर) : बौद्ध पौर्णिमेच्या पवित्र निमित्ताने आज दि. १ मे २०२६ रोजी उमरोली येथील आंबेडकर नगर परिसरात नवीन बौद्ध विहाराचे भव्य उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न झाला. या विहाराचे उद्घाटन मा. श्री राजेंद्र गावित साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, उमरोलीचे लोकप्रिय सरपंच प्रभाकर पाटील, बहुजन विकास आघाडीचे समन्वयक प्रशांत पाटील, उद्योजक संघाचे पदाधिकारी, डहाणू-पालघर बौद्ध युवक मंडळाचे अध्यक्ष विनोदजी मोरे, उपसरपंच माळी, उमरोली बौद्ध युवक मंडळाचे अध्यक्ष जयवंत मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच भन्ते करुणानिधी महाथेरो यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले. सामाजिक कार्यकर्ते छबीलदास गायकवाड, ॲडव्होकेट निखिल राऊत, अजिंक्य मस्के, शांताराम मोरे, विशाल मोरे, जगन्नाथ गायकवाड, माजी नगरसेवक संजय गायकवाड, उमेश राऊत यांसह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली.
उमरोली, बिरवाडी, पंचली, पालघर, आंबोडे तसेच परिसरातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने बौद्ध बांधव आणि भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमात बौद्ध धम्माच्या संदेशाचा प्रसार करत सामाजिक एकात्मता आणि बंधुत्वाचा संदेश देण्यात आला.
नवीन बौद्ध विहारामुळे परिसरातील नागरिकांना धार्मिक व सामाजिक उपक्रमांसाठी एक सुसज्ज केंद्र उपलब्ध झाले असून, यामुळे समाजातील ऐक्य आणि प्रगतीला चालना मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

मोठा अपघात! मुंब्रा येथे ट्रेनमधून ट्रॅकवर पडून 5 प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जखमी

शिवसेना ( उबठा ) गटाचे डहाणू ता. प्रमुखासह शेकडो कार्यकर्त्यांचा मा. हितेंद्रजी ठाकूर ( आप्पा ) यांच्या उपस्थितीत ब. वि. आघाडी मध्ये जाहीर प्रवेश