डहाणू-नरपड ते चिखला मार्ग पुराच्या पाण्याने खचला; वाहतूक पूर्णपणे बंद, नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

डहाणू-नरपड ते चिखला मार्ग पुराच्या पाण्याने खचला; वाहतूक पूर्णपणे बंद, नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

डहाणू, (प्रतिनिधी)दि. २३ जुलै : मुसळधार पावसामुळे डहाणू तालुक्यातील नरपड ते चिखला हा महत्त्वाचा रस्ता पुराच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहात पूर्णपणे खचला आहे. रस्त्याचा मोठा भाग वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली आहे.
सध्या या मार्गावरून कोणत्याही प्रकारच्या वाहनांची किंवा पादचाऱ्यांची ये-जा करणे अत्यंत धोकादायक असून, प्रशासनाने नागरिकांना या रस्त्याचा वापर न करण्याचे आवाहन केले आहे. पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.
संबंधित यंत्रणांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, पाणी ओसरल्यानंतर रस्त्याची पाहणी करून दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे.
⚠️ नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन :
नरपड–चिखला मार्गावर जाणे टाळावे.
बंद रस्त्यावरून वाहन नेण्याचा किंवा पायी जाण्याचा प्रयत्न करू नये.
प्रशासन व पोलीस यंत्रणेच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.
सुरक्षित पर्यायी मार्गांचा वापर करावा.

Comments

Popular posts from this blog

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

केळवेत अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमध्ये संताप; चौकशीची मागणी