ग्रामपंचायती मधुन प्रकल्प स्तरावर 10 ग्रामपंचायतींची निवड करण्यासाठी विवरण पत्रासह अर्ज सादर करावे
*ग्रामपंचायती मधुन प्रकल्प स्तरावर 10 ग्रामपंचायतींची निवड करण्यासाठी विवरण पत्रासह अर्ज सादर करावे*
पालघर (प्रतिनिधी)दि. 19 : जव्हार प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यांच्या कार्यक्षेत्रातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा या तालुक्यातील मागील 3 वर्ष पेसा निधीची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या उत्कृष्ठ पेसा ग्रामपंचायतीची निवड करण्यासाठी पेसा ग्रामपंचायती मधुन प्रकल्प स्तरावर 10 ग्रामपंचायतींची निवड करणेसाठी विवरण पत्रासह अर्ज मागविण्यात येत आहेत.
*विवरण पत्र प्रकल्प कार्यालयात निशुल्क उपलब्ध आहे.*
*अर्ज सादर करण्यासाठी कालावधी दि. 29/05/2023 पर्यंत पेसा ग्रामपंचायतींनी विवरण पत्रासह अर्ज सादर करावेत यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहेत.*
अर्ज प्रकल्प कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहील, अर्जावर ग्रामसेवक व सरपंच यांची स्वाक्षरी असणे बंधनकारक राहील, ग्रामपंचायत पेसा क्षेत्रातील असणे आवश्यक आहे. (पेसा अधिसुचनामध्ये नाव असणे आवश्यक आहे), अर्जासोबत विवरण पत्र पुर्ण भरणे आवश्यक आहे अन्यथा अर्ज बाद करण्यात येईल, प्रकल्प स्तरावरुन निवड समितीमार्फत निवड झालेल्या 10 ग्रामपंचायतींची नावे विभागीय स्तरावर /अप्पर आयुक्त स्तरावर सादर करण्यात येतील व तेथे निवड समितीमार्फत निवड झालेल्या पेसा ग्रामपंचायतीला 10 लक्ष रुपयाचे प्रोत्साहनपर निधी, प्रशस्तीपत्र आणि पदक प्रदाण करण्यात येईल, तसेच विभागीय स्तरावरुन निवड झालेल्या पेसा ग्रामपंचायतींची नावे राज्य स्तरावर सादर करण्यात येतील व तेथे निवड समितीमार्फत निवड करण्यात येणाऱ्या पेसा ग्रामपंचायतीकडुन रु. 15. लक्षाचा आराखडा मागविण्यात येवुन सदर आराखड्यास राज्यस्तरीय समितीव्दारा मंजुरी प्रदाण करण्यात येईल. असे आयुषी सिंह, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment