वळ ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी वनिता पाटील यांची निवड!माझा सन्मान म्हणजे माझ्या गावाचा सन्मान होय - वनिता पाटील

वळ ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी वनिता पाटील यांची  निवड!
माझा सन्मान म्हणजे माझ्या गावाचा सन्मान होय - वनिता पाटील
भिवंडी दि.३०(स्व.रा.तो) 
भिवंडी तालुक्यातील
वळ ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. योगिता नरेंद्र पाटील यांनी आपल्या सरपंच पदाचा त्यांना दिलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर सहखुशीने राजीनामा  दिल्यामुळे नवनिर्वाचित उपसरपंच सौ. वनिता अनिल पाटील  यांच्याकडे मंगळवार दिनांक ३०/५/२०२३ रोजी  ग्रामसेविका कु.श्वेता कृष्णा पाटील यांनी नवनिर्वाचित उपसरपंच सौ. वनिता अनिल पाटील  यांच्याकडे सरपंच पदाचा पदभार सोपविला त्यामुळे नवनिर्वाचित प्रभारी सरपंच यांचे उपस्थित सर्वांनी स्वागत करून अभिनंदन केले, यावेळी त्यांना  शुभ आशीर्वाद देण्यासाठी दक्षता कमिटी, कैलासनगर वळपाडा ग्रामस्थ मंडळ, भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती श्री. विकास अनंत भोईर , शिवसेना व तालुका प्रमुख श्री चक्रधारी पाटील शाखाप्रमुख अनंता भांमरे, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील ,माजी सदस्य संदीप पाटील, माजी सरपंच श्री. संजय कृष्णा पाटील ,माजी सरपंच सौ. नंदिनी शिवाजी भोईर,श्री. मिथुन पाटील ,मुरलीधर पाटील ,अनिल पाटील आजी माजी सरपंच, उपसरपंच व मोठ्या संख्येने ग्रामस्थ वर्ग व ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग उपस्थित होते,  प्रभारी सरपंच निवड प्रक्रिया यशस्वी पार पाडण्यासाठी माजी सरपंच राम भोईर, अमित भोईर , मावळते  उपसरपंच श्री.रामनाथ रामचंद्र पाटील, 
सन्माननीय सदस्य सौ. राजुबाई नाईक,  सौ. प्रेषिता भागीरथ पाटील ,श्री.सचिन सत्यवान पाटील, सौ.रविता मुरलीधर पाटील ,यांनी उपस्थित राहून निवड प्रक्रिया यशस्वी पार पाडण्यासाठी  विशेष सहकार्य केले त्यामुळे या सर्वांचे नवनिर्वाचित प्रभारी सरपंच सौ. वनिता अनिल पाटील यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले तसेच हा सन्मान माझा नसून माझ्या सर्व कैलास नगर वळपाडा गावातील  ग्रामस्थांचा आहे, असे यावेळी नवनिर्वाचित सरपंच सौ. वनिता अनिल पाटील यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरणशी बोलताना सांगितले.

Comments

Popular posts from this blog

डहाणू-नरपड ते चिखला मार्ग पुराच्या पाण्याने खचला; वाहतूक पूर्णपणे बंद, नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

केळवेत अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमध्ये संताप; चौकशीची मागणी