मा. श्री.अब्दुल सत्तार कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य, शेतकरी यांच्या समस्या निवारणार्थ पालघरला येणार !

मा. श्री.अब्दुल सत्तार कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य, शेतकरी यांच्या समस्या निवारणार्थ पालघरला येणार   ! 
दिनांक १६ मे
पालघर ( एच. लोखंडे  ) श्री.एकनाथजी शिंदे - मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, व श्री.देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली, मा.श्री. बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदयसम्राट यांच्या विचारांचा जनसामान्य पर्याय नेण्यासाठी. श्री. राजेंद्र गावीत खासदार पालघर यांच्या पुढाकाराने व प्रयत्नांती पालघर जिल्ह्यातील प्रकल्प बाधित शेतकरी, गावकरी यांच्या अनेक समस्यांनचे निवारण करण्यासाठी मा. श्री. अब्दुल सत्तार कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य दिनांक १७ मे २०२३ रोजी, गावदेवी मंदिर हाॅल, चिंचणी तालुका डहाणू जिल्हा पालघर येथे दुपारी अंदाजे १२ वाजता येणार आहे. 
              या अनुषंगाने पालघर जिल्ह्यातील प्रकल्प बाधित शेतकरी व ईतर समस्या चे निवारण करण्यासाठी सदर  मेळाव्याचे आयोजन केले आहे. तरी जिल्ह्यातील शेतकरी बंधू भगिनींनी यांनी याचा लाभ घ्यावा.आपल्या  समस्या, मागण्या,  सूचना, लेखी स्वरूपात आणल्यास  सोडवण्यासाठी त्याचा उपयोग होईल. तरी प्रकल्प बाधित शेतकरी, गावकरी याची उपस्थिती लक्षणीय असावी. सदर माहिती श्री. केदार काळे- सामाजिक कार्यकर्ते पालघर यांच्या कडून मिळत आहे.

Comments

Popular posts from this blog

डहाणू-नरपड ते चिखला मार्ग पुराच्या पाण्याने खचला; वाहतूक पूर्णपणे बंद, नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

केळवेत अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमध्ये संताप; चौकशीची मागणी