*मतदानाचा हक्क बजावण्यासाठी १८ मे रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर
*मतदानाचा हक्क बजावण्यासाठी १८ मे रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर*
पालघर (,pratinidhi)दि 16. :. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील सदस्य / थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या ३१ ग्रामपंचायतींच्या ३६ सदस्य पदे व २ सरपंच पदांच्या पोटनिवडणूकांसाठी पारंपारीक पध्दतीने राबविण्यात येणार आहे. निवडणूक कार्यक्रम असलेल्या कार्यक्षेत्रातील फक्त मतदारांना, विविध खाजगी आस्थापना, दुकाने आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाटयगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपींग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी येथील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान असलेल्या कार्यक्षेत्रातील फक्त मतदारांना गुरूवार, दि. १८/०५/२०२३ रोजी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे असे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी कळविले आहे
. मतदानाच्या दिवशी अनुपस्थीतीमुळे धोका अथवा मोठया प्रमाणावर नुकसान होईल, अशा उद्योगातील कामगार मतदारांना मतदानाचा हक् बजावण्यासाठी दोन तासाची विशेष सवलत देण्यात यावी, असे कामगार अधिकारी यांनी संबधित आस्थापना यांना कळवावे असे निर्देश जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी दिले .
Comments
Post a Comment