जिल्हा क्रीडा कार्यालया मार्फत पालघर मध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन
*जिल्हा क्रीडा कार्यालया मार्फत पालघर मध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन*
पालघर(प्रतिनिधी) दि. 18 :-आदिवासी बहुल जिल्ह्यात खेळाचा प्रचार, प्रसार व विकास व्हावा म्हणून पालघर जिल्हा क्रीडा कार्यालया मार्फत वेगवेगळे उपक्रम राबविले जातं आहेत. *श्वास क्रीडा, ध्यास क्रीडा* या संकल्पनेतून व याचाच एक भाग म्हणून 8 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनसाठी विविध खेळाची क्रीडा शिबीरे पालघर जिल्हाक्रीडा कार्यालया मार्फत आयोजित केली गेली आहेत.
. पालघर, सफाळे, विक्रमगड, जव्हार, वसई (अमेय क्लासिक क्लब )येथे शिबिरास सुरवात देखील झाली आहे.यामध्ये , मैदानी खेळ,कबड्डी, हॉलीबॉल , फुटबॉल, खोखो, बॅडमिंटन, बॉक्सिंग,आर्चरी,कराटे, इत्यादी खेळांचे मोफत प्रशिक्षण तज्ञ प्रशिक्षकांकडून दिले जाणार आहे.या शिबिरात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत क्रीडा गणवेश दिला जाणार आहे.या शिबिरात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन सुहास व्हनमाने, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
Comments
Post a Comment