सफाळे सर्पमित्र गृप ने, सामाजिक बांधिलकी जपत घेतली, भटक्या फिमेल कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठीची जबाबदारी
*सफाळे सर्पमित्र गृप ने, सामाजिक बांधिलकी जपत घेतली, भटक्या फिमेल कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठीची जबाबदारी* !
सफाळे ( एच. लोखंडे ) प्रत्येक गाव, खेडे, पाडे किंवा शहरातील, सर्वसामान्य नागरिकापासून ते उच्चभ्रूंच्या वसाहती राहणाऱ्या लोकांना. आपल्या परिसरातील भटक्या कुत्र्यांन पासून होणारा त्रास. या बद्दल बोलणारे / लिहिणारे अनेक आहेत. परंतु त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही.
या बद्दल सारासार विचार करीत, आपली सामाजी बांधीलकी जपत, सफाळे सर्पमित्र गृप व त्यांचे सहकारी यांनी, सफाळे परिसरातील वेगवेगळ्या भागातील भटक्या फिमेल कुत्र्यांना पकडून, ठाणे येथे नेऊन. ठाणे येथील C P C A या संस्थेच्या सहकार्याने आज पर्यंत अंदाजे २५ ते ३० फिमेल कुत्र्यांनची नसबंदी करून त्यांना परत, आणून सोडले आहे. त्यामुळे त्याच्या वाढत्या संखे वर नियंत्रण ठेवता येईल. जनतेला कुत्र्यांन पासून होणार त्रास कमी होण्यासाठी मदत होईल.
एवढेच नव्हे तर मुके प्राणी फिमेल कुत्रे यांना, होणारा ट्युमरचा त्रास पाहता. त्यांना ही I D A - देवनार मुंबई या संस्थेच्या सहयोगाने मुंबई देवनार येथे नेऊन त्यांचेही ऑपरेशन करून त्यांना परत, त्याच ठिकाणी आणून सोडण्यात आले.
सफाळे सर्पमित्र गृप हा आपली सामाजिक बांधिलकी जपत, आपण ज्या समाजात जन्मालो, वाढलो याची जाणीव घेऊन आपले सामाजिक कार्य करीत आहे. वेळप्रसंगी कोणतीही नैसर्गिक आपत्ती, अपघात असो किंवा कोणावरही आपत्ती संकटं उद्भवले असल्याने समजताच, काळ, वेळ ठिकाण याचा विचार न करता टिम किंग *प्रशांत मानकर - पिंट्या* व त्याची टिम पोहचणार यांची सफाळे नव्हे तर पालघर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला आशा असते. हिच सर्पमित्र गृप च्या कार्याची पोच आहे
Comments
Post a Comment