हरवलेल्या व्यक्ती च्या शोधकामीसफाळे पो. ठाणे ता. जि. पालघर

फोटोत दिसत असलेल्या व्यक्ती व वर्णन केलेले व्यक्ती ह्या  
हरवलेल्या व्यक्ती च्या शोधकामी
सफाळे पो. ठाणे ता. जि. पालघर
सफाळे  ( एच. लोखंडे ) मिलिंद गोवऱ्या बोबांडे वय वर्षे २६ व्यावसाय मजुरी, रा. भोईरपाडा -  खडकोली पो. तांदुळवाडी ता. जि. पालघर. यांनी दिनांक १४ मे २०२३ रोजी सफाळे पोलीस ठाणे येथे येऊन आपली पत्नी सौ. उज्ज्वला मिलिंद बोबांडे वय वर्षे २४, हि भोईरपाडा खडकोली येथील राहत्या घरातून ११ मे २०२३ रोजी सकाळी अंदाजे ९ च्या सुमारास तिच्या पोटात दुखत असल्याने मुलाला (राज मिलिंद बोबांडे वय वर्षे ०६ ) बरोबर घेऊन. चहाडे येथील सरकारी रुग्णालयात जाते, असे सांगून गेली  ती आज पर्यंत माझी पत्नी उज्ज्वला व मुलगा राज घरी परत आले नाही. किंवा तिच्याशी कुठल्याही प्रकारे संपर्क होते नसल्याने, तसेच नातेवाईक यांच्या कडेही आढळून न आल्याने, सफाळे पोलीस ठाणे येथे मनुष्य मिसिंग रजिस्टर नंबर ०५ / २०२३ ने केस नोंदणी करण्यात आली आहे. 
            फोटोत दिसत असलेल्या व्यक्ती व वर्णन केलेले व्यक्ती एकच आहे. 
          सौ. उज्ज्वला - अंगावर नेसूस, पिवळ्या रंगाची साडी, पायात लाल रंगाची चप्पल, रंग गोरा, अंगाने सडपातळ, उंची ५ फुट ६ इंच, चेहरा लांब, नाक सरळ, कानात साधे कर्णफुल, गळ्यात मंगळसूत्र, डाव्या हातावर यु आणि एम व बदाम चिन्ह, हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या, भाषा मराठी बोलत. 
     राजचे वर्णन - वय वर्षे ०६, अंगावर काळ्या  पिवळ्या रंगाचे टि शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, पायात जांभळ्या रंगाची चप्पल, रंग सावळा, अंगाने सडपातळ, चेहरा गोल, नाक सरळ, कपाळी भगव्या रंगाचा टिळा, उंची ४ फुट ०२ इंच, भाषा मराठी बोलतो. 
           सदर व्यक्ती कोणासही कुठे ही आढळून आल्यास किंवा दिसून आल्यावर मोबाईल नंबर ८६६९६०४०३७ किंवा ९९८७३३३२३७ वर संपर्क करावा.

Comments

Popular posts from this blog

डहाणू-नरपड ते चिखला मार्ग पुराच्या पाण्याने खचला; वाहतूक पूर्णपणे बंद, नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

केळवेत अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमध्ये संताप; चौकशीची मागणी