पारिजात मुंबई यांचा समाजभान बाळगणारा उपक्रम "बॅक टू स्कूल"
*पारिजात मुंबई यांचा समाजभान बाळगणारा उपक्रम "बॅक टू स्कूल"*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आज आपल्या महाराष्ट्रातील बहुसंख्य गरीब, वनवासी, लहान मुले, विद्यार्थीवर्ग, तरुणवर्ग पुस्तकांसोबत शैक्षणिक साहित्याच्या अभावामुळे शिक्षणापासून वंचित राहत आहेत. या शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मात्र परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित वर्गाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी *पारिजात मुंबई* प्रतिवर्षी प्रमाणे *"बॅक टू स्कूल २०२३"* उपक्रम राबवत आहे. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील दुर्गम आणि आदिवासी पाड्यातील शाळेत होतकरू मुलांना "शालेय किट सह बॅग" देऊन त्यांना शिक्षणाशी जोडून राहण्यास मदत करते.
या उपक्रमात आपणही सहभागी होऊ शकता. आपण जितक्या बॅग्स साठीचे आर्थिक योगदान द्याल तितक्या अधिक मुलांना आम्हांला "बॅक टू स्कूल" उपक्रमात सहभागी करून घेता येईल. पारिजात मुंबई ला दिलेली देणगी ८०जी अंतर्गत टॅक्स रिबेटसाठी पात्र आहे. मदत केल्यानंतर आपण खालील लिंक वर क्लिक करा आणि आपली माहिती भरा, जेणेकरून सदर मदतीची आम्हाला नोंद घेता येईल. सोबत संस्थेचे बँकेची सविस्तर माहिती दिलेली आहे. अधिक माहितीसाठी हर्षद विष्णू ठाकरे 8655129876 यांना संपर्क साधू शकता.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe92lyrygzwR4GPfQjsImZ4x2nLooagD1V780WzgkAUib2k9w/viewform?usp=pp_url
Comments
Post a Comment