ठाणे जिल्ह्यातील १८ तलाठ्यांची मंडळ अधिकारी म्हणून नियुक्ती! भिवंडीतील चार तलाठी झालेमंडळ अधिकारी....

ठाणे जिल्ह्यातील १८ तलाठ्यांची मंडळ अधिकारी म्हणून नियुक्ती! 
भिवंडीतील चार तलाठी झाले
मंडळ अधिकारी.... 
भिवंडी. दि.१९(स्व.रा.तो) जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय ठाणे येथून  शुक्रवार दिनांक१९/५/२०२३ रोजी ठाणे जिल्ह्यातील १८ तलाठ्यांची त्यांच्या शासकीय सेवेतील कार्याची दखल घेऊन सेवाजेष्ठते नुसार मंडळ अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, त्यामध्ये भिवंडीतील चार तलाठी  हे मंडळ अधिकारी या पदावर नियुक्त झाले आहेत, महसूल विभागात अत्यंत प्रामाणिकपणे गेली अनेक वर्ष काम करणाऱ्या तलाठ्यांमध्ये भिवंडीत भिवंडीचे तहसीलदार श्री.अधिक पाटील यांच्या अधिपत्याखाली काम करत असलेल्या  खोणी तलाठी श्री. योगेश विठ्ठल भोजने, पूर्णा तलाठी श्री. सुधाकर गोपाळ कामडी, पडघा तलाठी श्रीमती प्रतिभा दिलीप चव्हाण, बोरिवली तर्फे राहुर तलाठी श्रीमती रोहिणी भिकाजी सावंत, यांचा समावेश असल्याची माहिती वडपे तलाठी श्री.गणेश पाटील यांनी दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना दिली, या सर्व मंडळ अधिकारी यांचे दैनिक स्वराज्य  तोरण परिवाराकडून मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा यापुढेही त्यांच्या हातून चांगले कार्य घडावे हीच सदिच्छा....

Comments

Popular posts from this blog

डहाणू-नरपड ते चिखला मार्ग पुराच्या पाण्याने खचला; वाहतूक पूर्णपणे बंद, नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

केळवेत अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमध्ये संताप; चौकशीची मागणी