अवैध रित्या विनापरवाना, गुरांची वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल. सफाळे पोलीस ठाणे ता. जि. पालघर
अवैध रित्या विनापरवाना, गुरांची वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल.
सफाळे पोलीस ठाणे ता. जि. पालघर
सफाळे ( एच. लोखंडे ) दिनांक १८ मे २०२३ रोजी सकाळी सफाळे रेल्वे फाटक जवळपास, सफाळे पश्चिमेस महेंद्र कंपनीचा, पांढऱ्या रंगाचा एक पिकअप टेम्पो. क्रमांक एम. एच. ४८ / सी. बी. ७२८२, यामध्ये मानवतेला काळीमा लागेल अश्या पद्धतीने, क्रुरपणे. दोन ( २ ) बैल जातीचीं जनावरे, यांना वेदना / यातना होईल. अश्या रितीने मानेला व पायांना दोरी ने घट्ट बांधून ठेऊन / परिरूध्द करून. सदर जनावरे यांना निर्दयी, क्रुरपणे वागणूक देत, मुक्या जनावरांना चारा पाण्याची कोणत्याही प्रकारची सोय उपलब्ध करून न देता. सदर टेम्पो मध्ये आढळून आले असताना, सदर टेम्पो सोबतच असणारे १) करण विलास पाटील - वय वर्षे २१ व्यवसाय नोकरी. रा. डोंगरे पो. एडवण ता. जि. पालघर, २) प्रविण यशवंत पाटील - वय वर्षे ५३ व्यवसाय शेती. रा. खटाळी पो. केळवा, ता. जि. पालघर. ३) परेश प्रभाकर भोईर - वय वर्षे ३२ रा. डोंगरे पो. एडवण ता. जि पालघर यांच्या कडे चौकशी केली असतांना, त्यांच्या कडे जनावरे ( बैल ) यांची वाहतूकीसाठी कायदेशीर कोणताही परवाना किंवा परवानगी आढळून आली नाही.
यामुळे अवैध रित्या क्रुरपणे वागणूक देत, मुक्या जनावरे यांची वाहतूक करतांना आढळून आले म्हणून. सफाळे पोलीस ठाणे. ता. जि. पालघर येथे वरील तिनही आरोपी यांच्या विरोधात. गुन्हा. रजि. क्रमांक ४७ / २०२३ महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा १९७६ चे कलम ६,९,११ अन्वये. प्राण्याना क्रूरतेने वागविण्यास - प्रतिबंधक करण्याबाबत, अधिनियम १९६० चे कलम ११, ( ड ), ( ई ) ॲनिमल ट्रान्सपोर्ट कायदा कलम, ५७, ५८, ५९ अन्वये सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला मुद्दे माल १) एक - काळ्या रंगाचा, मजबूत बांधा असलेला, अंदाजे १ फुट लांबीची, वळलेली शिंगे असलेला बैल. अंदाजे किंमत २५,०००/- रूपये. २) एक -पांढऱ्या रंगाचा, त्यावर काळ्या रंगाची ठिपके असलेला, मजबूत बांधा असलेला व अंदाजे १/२ फुट लांबीची, उभे शिंगे असलेला बैल. अंदाजे किंमत २८,०००/- रूपये. तसेच एक पांढऱ्या रंगाचा, महेंद्र कंपनीचा वापरात असलेला, पिक - अप टेम्पो क्रमांक एम. एच. ४८ / सी. बी. ७२८२ , अंदाजे किंमत ३,००,०००/- रूपये. असा एकुण अंदाजे ३,४८,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
वरील तिनही संशयित आरोपी यांची, सफाळे पोलीस ठाणे प्रभारी पोलीस अधिकारी श्री. अमोल गवळी - स. पो. निरीक्षक. यांच्या नेतृत्वाखाली व मा. वरिष्ठ पोलीस अधिकारी पालघर यांच्या निरीक्षणाखाली, तपासी अंमलदार श्री. एन. एल. धोंगडे पुढील तपास करीत आहेत.
Comments
Post a Comment