ग्रामपंचायत कोनगांव यांनी कविता भगत व शुभांगी मुकादम यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने केले सन्मानित!
ग्रामपंचायत कोनगांव यांनी कविता भगत व शुभांगी मुकादम यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने केले सन्मानित!
भिवंडी.दि.३१.(स्व.रा.तो)
*राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कोनगांव यांनी बुधवार दिनांक ३१/५/२०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे सामाजिक कार्याबद्दल मा.जि प सदस्या श्रीमती कविता गुरुनाथ भगत आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल सौ.शुभांगी मनोज मुकादम अशा कोनगावातील दोन कर्तबगार महिलांना सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटील यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले, यावेळी उपसरपंच श्री.गंगाराम दुंदा पाटील,ग्रामविकास अधिकारी श्री.राजू ज्ञानोबा आंधळे,ग्रामपंचायत सदस्या सौ.कृतिका प्रमोद पाटील,सौ.दिपाली सचिन कराळे,सौ.कविता गोरक्ष भगत,सौ.रजनी कमलाकर नाईक,सौ.रेखा दिपक मुकादम,सौ.रेखा निलेश मुकादम,कु.अनिकेत मच्छीन्द्र म्हात्रे यांच्या उपस्थितीत सन्मान चिन्ह,शाल,श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.*
Comments
Post a Comment