हरवलेल्या व्यक्तीच्या शोध कामी. विरार पो ठाणे ता. वसई जि. पालघर

हरवलेल्या व्यक्तीच्या शोध कामी. 
विरार पो ठाणे ता. वसई जि. पालघर
 दिनांक २१ मे
पालघर ( एच. लोखंडे  ) सौ. वैष्णवी विजय श्रीवर्धनकर वय वर्षे ५२ रा. गडकरी नगर, चंदनसार रोड विरार पुर्व ता. वसई जि. पालघर यांनी आपले पती श्री. विजय तुकाराम श्रीवर्धनकर, वय. वर्षे ६० हे त्यांच्या राहत्या घरातून. कोणासही काही एक न सांगता. दिनांक १५ मे २०२३ रोजी सकाळी १० च्या सुमारास निघून गेले असता. त्यांचे सगेसोयरे, नातेवाईक, मित्र मंडळी यांच्या कडे शोध घेतला असता ते कुठेही आढळून आले नाहीत. किंवा घरीही परत आले नाहीत.
         यामुळे दिनांक १५ मे २०२३ रोजी सौ. वैष्णवी विजय श्रीवर्धनकर यांनी विरार पोलीस ठाणे ता. वसई जि. पालघर येथे येऊन खबर दिली असताना, विरार पो. ठाण्यात मनुष्य मिसिंग रजिस्टर नंबर १३० / २०२३ अन्वये मिसिंग दाखल करण्यात आली आहे. 
              फोटोत  दिसत असलेली व वर्णन केलेली व्यक्ती एकच आहे. 
           श्री. विजय तुकाराम श्रीवर्धनकर वय वर्षे ६०, अंगात नेसुस- भगव्या रंगाचे बनियन व चाॅकलेटी रंगाची हाॅफ पॅन्ट, बांधा - मध्यम, उंची - ५ फुट ३ इंच, रंग - गव्हाळ, केस - काळे, डोळे - घारे, डोक्यावर पुढे टक्कल पडलेले, पायात स्पार्क कंपनीची, काळ्या रंगाची किटो, बोलीभाषा मराठी, *विसर भोळे*
        सदर व्यक्ती कोणालाही आढळून आल्यास किंवा दिसून आल्यावर खालील मोबाईल नंबर वर संपर्क करावा - विरार पोलीस ठाणे पुर्व मो. नं. ८६६९६०४०२० / ८६७९६०४०२२

Comments

Popular posts from this blog

डहाणू-नरपड ते चिखला मार्ग पुराच्या पाण्याने खचला; वाहतूक पूर्णपणे बंद, नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

केळवेत अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमध्ये संताप; चौकशीची मागणी