मौजे माकणे ता. जि. पालघर हद्दीत मिळाला पुरुष जातीचा मृत देह.

मौजे माकणे ता. जि. पालघर हद्दीत मिळाला पुरुष जातीचा मृत देह. 

सफाळे ( एच. लोखंडे ) सफाळे पश्चिम भागातील माकणे हद्दीतील  युनिट बिल्डर अॕन्ड डेव्हलपर्स कंट्रक्शनच्या साईडच्या बाजूच्या गजानन घरत रा. माकणे यांच्या मालकीच्या मोकळ्या जागेतील झाडाखाली आढळून आला असल्याची माहिती मिळून आली असताना, सफाळे पोलीस ठाणे येथील कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांनी त्वरित घटना स्थळी धाव घेतली. 
          सदर घटना स्थळावर सफाळे पोलीस ठाणे प्रभारी पोलीस अधिकारी श्री.अमोल गवळी सहा. पो. निरीक्षक यांनी त्वरित भेट देऊन, पाहणी करीत चौकशी करीत असतांना. सदर मिळून आलेला मृत देह हा दर्शन पुष्कराज दिक्षित रा. कांता अथर्व सेंटर पार्क पंडित पाडा माकणे ता. जि. पालघर याचा असल्याची माहिती मिळाली. 
       सदर घटने बाबतीत मयत यांचे भाऊ श्री. नैनेश पुष्कराय दिक्षित वय वर्षे ४२ व्यवसाय नोकरी रा. रू. नं. ४०५ , कांता अथर्व सेंटर पार्क पंडित पाडा, माकणे, ता. जि. पालघर यांने माहिती ( खबर ) दिली असताना. सदर मयत हा त्यांचा मयत दर्शन पुष्कराय दिक्षित -  वय वर्षे ४१ हा भाऊ असून. मयतास लहानपणापासून आकडी येण्याचा आजार होता. तसेच तो मनोरुग्ण असल्याचे सांगितले. मयत हा वेडाच्या भरत घरातील, कोणालाही काही एक न सांगता निघून गेला. त्यामुळे त्यास आकडी येऊन त्यामध्ये तो मयत झाला असावा. त्यांच्या मृत्यू बाबत खबर देणारा यांचे दर्शन यांच्या मृत्यू बद्दल कोणा विरूध्द संशय किंवा तक्रार नसल्याने. सफाळे पोलीस ठाणे येथे अपघाती मृत्यू रजि. नंबर ०८/२०२३ प्रमाणे दंड प्रकिया संहिता ( सी. आर. पी. सी. ) कलम १७४ प्रमाणे नोंदणी करण्यात आली असून, तपासी अंमलदार, श्री. बी. के. भावर हे वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

डहाणू-नरपड ते चिखला मार्ग पुराच्या पाण्याने खचला; वाहतूक पूर्णपणे बंद, नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

केळवेत अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमध्ये संताप; चौकशीची मागणी