साहित्यिक डॉ. दिलीप धानके स्मृति वक्तृत्व प्रेरणा पुरस्काराने कु. संस्कृती सदानंद म्हात्रे सन्मानित

*साहित्यिक डॉ. दिलीप धानके  स्मृति वक्तृत्व प्रेरणा पुरस्काराने कु. संस्कृती सदानंद म्हात्रे सन्मानित*

     भिवंडी (प्रतिनिधी)ज्येष्ठ साहित्यिक डॉ.दिलीप धानके यांचा द्वितीय स्मृतिदिन व ठाणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाच्या 22 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने लोक हिंद न्यूज चॅनल आणि साप्ताहिक शिवमार्ग यांच्यावतीने दिले जाणारे लोक हिंद गौरव पुरस्काराचे वितरण साई भगवान लॉन्स शहापूर, जिल्हा ठाणे येथे राज्यातील ठाणे, पालघर, रायगड, मुंबई, नागपूर, बीड, यवतमाळ आदी  जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना लोक हिंद गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

     लोक हिंद गौरव पुरस्काराचे हे पाचवे वर्ष असून या कार्यक्रमास चित्रपट निर्माते नरेंद्र जिचकार, चित्रपट दिग्दर्शक पार्श्वगायक विराग वानखेडे आमदार दौलत दरोडा, दयानंद चोरघे, आदी मान्यवांसह पाहुणे व ग्रामस्थ मोठया संख्येने   उपस्थित होते. प्रसंगी राज्यभरातील विविध क्षेत्रातील ३८ मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
  सदर कार्यक्रमात वक्तृत्व स्पर्धेतील विशेष यशाबद्दल भिवंडी येथील कु. संस्कृती सदानंद म्हात्रे या विद्यार्थिनीला कार्यक्रमाचे अध्यक्ष चित्रपट निर्माते नरेंद्र जिचकार तसेच सौ.व श्री विराग वानखेडे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांच्या समोर सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ,  ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, देऊन सन्मानित करण्यात आले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष श्री महेश धानके यांनी तर सूत्रसंचालन श्रीमती करुणा गगे व श्री. रमेश शिंदे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

डहाणू-नरपड ते चिखला मार्ग पुराच्या पाण्याने खचला; वाहतूक पूर्णपणे बंद, नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

केळवेत अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमध्ये संताप; चौकशीची मागणी