सफाळे आगरातील लांब पल्ल्याच्या गाड्या बंद करणारा झारीतील शुक्राचार्य कोण

*सफाळे आगरातील लांब पल्ल्याच्या गाड्या बंद करणारा झारीतील शुक्राचार्य कोण*
दिनांक २४ मे
सफाळे ( एच. लोखंडे ) सफाळे एस. टी आगारातून अनेक वर्षांपासून सफाळे - धुळे, जळगांव, भुसावळ, शिरपूर, चाळीसगाव, नंदुरबार आदी भागात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या परंतु एस. टी महामंडळाच्या नफ्यात  वाढ करणाऱ्या बसेस अनेक वर्षांपासून सुरू होत्या. परंतु कोणाच्या फायद्यासाठी, झारीतील शुक्राचार्य यांनी, सदर बसेस. सफाळे आगर व्यवस्थापक यांना कोणतीही लेखी, सुचना, निर्देश न देता, फक्त दुरध्वनी मार्फत, सुलतानी फतव्याव्दारे बंद करण्यास सांगितले. व हुकमाचे ताबेदार सफाळे आगर प्रमुख, व्यवस्थापक यांनी ही खानदेशातील प्रवासी जनतेला वाऱ्यावर सोडून बसेस बंद केलेल्या आहेत. 
            खान्देश जन्मभूमी असणारे , जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील एक नव्हे तर अनेक खान्देशातील बांधवांनी, कामधंदा, नोकरीसाठी येणारा शिक्षक वर्ग, सरकारी, निमसरकारी कर्मचारी, पांढरपेशी नोकरदार, पं. स. कर्मचारी, जि. प. कर्मचारी, महसूल विभाग, वैद्यकीय शेत्रातील अधिकारी- कर्मचारी यांनी सफाळे आपली कर्मभूमी मानली व ते सफाळे कर  म्हणून सफाळे परिसरात अनेक दशकापासून राहतात. 
      सेवा निवृत्त झालेले, नोकरी -  धंदा या कारणासाठी सफाळे परिसरात अंदाजे कमीत कमी १० हजारांहून अधिक राहणारे खांन्देशातील बांधवांनी सफाळे आपली कर्मभूमी मानून येथच स्थायिक  झालेले आहेत. यांना आपल्या जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील गावाकडे, सगेसोयरे, नातलग, यांच्या कडे , सुखदुःखाच्या प्रसंगी, लग्न समारंभ, छोटे मोठे समारंभ, सण, दिवाळीच्या / नाताळच्या / उन्हाळ्यातील सुट्या, दसरा, यात्रा आदी कार्यक्रमासाठी नेहमीच जाणे येणे असते. तर आदिवासी बहुबल्य असलेल्या  विक्रमगड, जव्हार, तालुक्यातील  ठिकाणी, जाणाऱ्या येणाऱ्या शालेय विद्यार्थी वर्ग / सरकारी, निमसरकारी अधिकारी वर्ग / कर्मचारी यांना ही कार्यालयीन कामकाजासाठी दररोज जाण्या येणारे यांची संख्या बरीच आहे. यांनाही जाण्या- येण्यासाठी एकच पर्याय म्हणून एस टी ने जाणे. 
          मा. श्री.. एकनाथजी शिंदे -  मुख्यमंत्री, यांनी जेष्ठ नागरिक, महिलांना एस टी. ने प्रवास करावा म्हणून सवलत दिली खरी परंतु खांन्देशात एस. टी. ने जाणाऱ्या येणाऱ्या महिलांचीच नव्हे जर जेष्ठ नागरिक यांचीही, त्याच प्रमाणे आदिवासी भागातील शालेय विद्यार्थी यांना मिळत असलेली सवलत, सदर सुलतानी फतव्याने काढून घेतली आहे. 
        सदर या सुलतानी फतव्याला विरोध करीत, सदर बसेस पूर्ववत सुरू करण्यासाठी. १) मा. विभाग नियंत्रक - म. रा. प. मं. पालघर विभाग. २) मा.श्री.   एकनाथ जी शिंदे साहेब -  मुख्यमंत्री-  महाराष्ट्र राज्य, ३) मा. श्री. परिवहन मंत्री - महाराष्ट्र राज्य. ४) मा. श्री. राजेंद्र गावीत खासदार -  पालघर, ५) मा. श्री. राजेश पाटील - आमदार बोईसर विधानसभा,आदि यांना ही लेखी पत्रा व्दारे, सदर बंद करण्यात आलेल्या बसेस पुर्ववत सुरू करण्यात याव्या. यासाठी अनेक नागरिकांनी सह्या केलेल्या निवेदनाची प्रत जोडून सर्वाना निवेदन देण्यात आले आहे. सदर बसेस पुन्हा पूर्ववत सुरू न करण्यात आल्यास, खान्देशवासी पुढील पवित्रा ❓😧 घेतली हे सांगता येत नाही.

Comments

Popular posts from this blog

डहाणू-नरपड ते चिखला मार्ग पुराच्या पाण्याने खचला; वाहतूक पूर्णपणे बंद, नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

केळवेत अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमध्ये संताप; चौकशीची मागणी