पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबीराचे तालुकास्तरावर आयोजन
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबीराचे तालुकास्तरावर आयोजन*
पालघर (प्रतिनिधी)दि. 24 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर कार्यक्रमाचे दि ३१ मे पर्यन्त जिल्ह्यातील ८ तालूक्यांमध्ये आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मल्लीनाथ कांबळे यांनी दिली आहे.
. समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या अडचणीचा शासकिय यंत्रणेकडुन सोडवणुक करण्यासाठी व समाजातील पीडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी .जिल्हाधिकारी गोविंद बोडके, यांच्या | निर्देशानुसार तालुकास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक २६ में रोजी विक्रमगड पंचायत समिती सभागृह , तसेच डहाणु , मोखाडा साई मंदीर हॉल व वसई येथील तहसील कार्यालय . तसेच दिनांक २९ में रोजी तलासरी पंचायत समिती सभागृह तसेच जव्हार येथील के व्ही हायस्कुल व पालघर येथे तहसील कार्यालय सभागृह आणि वाडा येथील पठारे मंगल कार्यालय येथे तालुक्याच्या ठीकाणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे पालघर जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पिडीत महिलांचे प्रश्न अडचणी व तक्रारीची शासकिय यंत्रणेकडुन निवारण करण्यासाठी विहित नमुन्यामध्ये संबधित तालुक्यातील अंगणवाडी सेविका / आशा वर्कर्स यांच्या मार्फत तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करुन त्यांच्या तालुक्यामध्ये आयोजित केलेल्या शिबीराच्या वरील प्रमाणे दिनांकास मोठ्या | संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मल्लीनाथ कांबळे, यांनी केले .
***
Comments
Post a Comment