इंदोर येथे संजीवन म्हात्रे व किशोर आढळकर मानद डाॅक्टरेटने सन्मानित.

इंदोर येथे संजीवन म्हात्रे व किशोर आढळकर मानद डाॅक्टरेटने सन्मानित.......
इंदोर येथे संजीवन म्हात्रे व किशोर आढळकर मानद डाॅक्टरेटने सन्मानित.

इंदोर (स्व.रा.तो) भिवंडी येथील  श्री.संजीवन केशव म्हात्रे,  हे महाराष्ट्र राज्यातील मु. आनंदी भवन इंडियन कार्पोरेशन, गुंदवली गाव, तालुका-भिवंडी, जिल्हा- ठाणे
 येथील स्थानिक भूमिपुत्र असून त्यांनी आपल्या २८ वर्षाच्या खडतर प्रवासानंतर समाजात एक नवीन स्थान निर्माण केले आहे, त्यांचे शिकण - D- pharms and D.M.L.T इथ पर्यंत पूर्ण झाले आहे, त्यानंतर त्यांनी
MEDICAL Stor and pathological labratory
सर्वसामान्य नागरिकांसाठी माफक दरात सुरू केली आहे, 
त्यामुळे त्यांचे समाजाप्रती असलेले ऋण आपल्यासमोर येत आहेत, तसेच ते भिवंडी केमिस्ट असोसिएशन चे माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य आहेत ते तीन वेळा बिनविरोध निवडून आलेले आहेत, त्याचप्रमाणे ते ठाणे  असोसिएशन चे ही सभासद आहेत, भिवंडी पॅथॉलॉजी असोसिएशनचे चार वेळा बिनविरोध सदस्य झाले आहेत, व आता ते अखिल भारतीय  फार्मासिस्टअसोसिएशनचे मुंबई विभागाचे उपाध्यक्ष आहेत, असा त्यांनी एकूण २८ वर्ष खडतर प्रवास केला आहे व त्यामधून त्यांनी हे सर्व साध्य केल आहे, त्याचबरोबर सामाजिक ,शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, धार्मिक, आध्यात्मिक, कार्यात देखील ते आपले योगदान देत असतात. त्याचप्रमाणे कोणताही स्पेशालिस्ट डॉक्टर असो  हे रक्त, लघवी, थायरॉईड,डायबिटीस यांची तपासणी करू शकत नाही, व अन्य कोणत्याही तपासण्या करू शकत नाही व या तपासण्या केल्याशिवाय ते योग्य निर्णय व उपचार देऊ शकत नाहीत हे तेवढेच महत्त्वाचे आहे, म्हणून pathological labratory मधून केल्या जाणाऱ्या कोणत्याही तपासण्या pathological labratory शिवाय होऊ शकत नाहीत त्यामुळेच त्यांना नुकताच इंदोर येथे या क्षेत्रातील  मानद डॉक्टरेट उपाधी विविध मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आली आहे, त्याचप्रमाणे श्री. किशोर आढळकर हे देखील डोंबिवली मध्ये विविध क्षेत्रातील नामवंत उच्चभूषित इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहेत, त्यांनाही सामाजिक, शैक्षणिक, स्वच्छता अभियान, वन संरक्षण, झाडे लावणे झाडे जगवणे, वनांचे पक्षांचे रक्षण करणे व शालेय विद्यार्थ्यांना नेहमीच सहकार्य करून त्यांनाही स्वच्छता अभियाना बरोबर  वन संरक्षणाचे रक्षण कसे करावे याबाबतची माहिती  देऊन त्यांच्या मनात झाडे फुले बगीचे याबाबत उत्साह निर्माण करण्याचे काम ते गेली २२ वर्षापासून करत आहेत म्हणून त्यांनाही त्यांच्या या विविध क्षेत्रातील पैलूंचा गाढा अभ्यासक म्हणून मानद डॉक्टरेट उपाधी विविध मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आली आहे, सदर कार्यक्रम इंदोर येथील माॅं भुवनेश्वरी आंतरराष्ट्रीय  विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम रविवार दिनांक २८/५/२०२३ रोजी इंदोर येथील हाॅटेल सयाजी  सभागृहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.इंदौर चे माजी मंत्री योगेंद्र महंत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.विद्दापीठाच्या कुलपती डाॅ.दिप्ती भदोरीया, चेअरमन डाॅ.संतोष भार्गव,
  रजिष्टार डाॅ.विद्दा सिंह
 माँ.भुवनेश्वरी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे सल्लागार समितीमध्ये नुकतीच निवड झालेले मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ.श्री.मनिलाल रतिलाल शिंपी, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील,विद्यापीठाचे सहायक एच के.आचार्य, तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा मानद उपाधि पदवी प्रदान सोहळा मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या सोहळ्यात अनेक राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा मानद डॉक्टर उपाधी ने सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे अन्य देशातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते, कार्यक्रमाची सुरुवात माँ.भुवनेश्वरी मातेच्या पूजनाने झाली तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Comments

Popular posts from this blog

डहाणू-नरपड ते चिखला मार्ग पुराच्या पाण्याने खचला; वाहतूक पूर्णपणे बंद, नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

केळवेत अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमध्ये संताप; चौकशीची मागणी