जखमी पक्ष्याला मदत करण्याचा प्रयत्न करताना मुंबईतील महिला ऑनलाइन घोटाळ्याला बळी

*जखमी पक्ष्याला मदत करण्याचा प्रयत्न करताना मुंबईतील महिला ऑनलाइन घोटाळ्याला बळी*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मालाड येथील ध्वनी मेहता नावाच्या महिलेला महालक्ष्मी येथील फेमस स्टुडिओमध्ये त्यांच्या कामाच्या ठिकाणी आलेल्या एका जखमी पक्ष्याला मदत करण्याचा प्रयत्न करताना ऑनलाइन घोटाळ्याच्या परिणामांना सामोरे जावे लागले. जखमी पक्ष्याकरता मदत मिळवण्यासाठी त्यांनी गुगलवर पक्षी बचाव संस्था शोधण्याचा निर्णय घेतला.

त्यांना ऑनलाइन उपलब्ध झालेल्या माहितीच्या अाधारे, ध्वनी यांनी पक्षी बचावात विशेष प्राविण्य असलेल्या प्रतिष्ठित संस्थेला संपर्क केला. तथापि, संस्थेचे लोक खरे मदत कर्मचारी नसून सायबर गुन्हेगार असल्याचे त्यांना समजले नाही.

घोटाळेबाजांनी त्वरीत ध्वनी यांना तक्रार अर्जाची लिंक दिली आणि त्यांना आश्वासन दिले की, अर्ज भरून देताच बचाव प्रक्रिया सुरू होईल. त्यांना तक्रार अर्जासोबत रुपये १/- ही नाममात्र फी भरावी लागणार होती. त्यांनी ती जमा केली.

अपेक्षित बचाव पथक ध्वनी यांच्या कार्यालयात पोहोचले नाही. चार दिवसांनंतरच ध्वनी यांना त्या ट्रेनमध्ये असताना एक एसएमएस आला, तेव्हा त्यांना समजले की, त्यांच्या बँक खात्यातून जवळपास एक लाख रुपये काढले गेले आहेत. न्याय मिळवण्यासाठी ध्वनी यांनी तातडीने त्यांच्या बँकेत तक्रार दाखल केली आणि घटनेची माहिती सायबर गुन्हे विभागाला दिली.

भारतीय दंड संहिता आणि २०००च्या माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार ध्वनी यांनी फसवणूक करणार्‍यांवर तोतयागिरी, फसवणूक आणि खोटेपणाची तक्रार दाखल केली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा जोरदार काम करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

डहाणू-नरपड ते चिखला मार्ग पुराच्या पाण्याने खचला; वाहतूक पूर्णपणे बंद, नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

केळवेत अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमध्ये संताप; चौकशीची मागणी