महाकृषि ऊर्जा अभियान पीएम-कुसुम घटक-ब योजनेच्या लाभा साठी ऑनलाईन अर्ज सादर करावा
*महाकृषि ऊर्जा अभियान पीएम-कुसुम घटक-ब योजनेच्या लाभा साठी ऑनलाईन अर्ज सादर करावा*
पालघर दि. 30 : राज्य शासनाने अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहनात्मक धोरणे जाहीर केली आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांच्या कृषीपंप वीज जोडण्यांचे विद्युतीकरण सौर ऊर्जेद्वारे करण्यासाठी राज्य शासन गेल्या काही वर्षांपासून स्वयंअर्थसहाय्यित तसेच केंद्र शासनाच्या अर्थसहाय्यातून विविध योजना राबवत आहे. त्याअंतर्गत केंद्र शासनाकडून देशभरात राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान महाभियानाला (पीएम-कुसुम) राज्यात गती देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
राज्य शासनाकडून दि. 12 मे 2021 रोजी राज्यात सदर योजनेसाठी शासन निर्णय निर्गमित केला. या अंतर्गत दरवर्षी 1,00,000 नग या प्रमाणे पुढील 5 वर्षामध्ये 5 लक्ष सौर कृषिपंप प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले. सदर योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90 टक्के व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95 टक्के अनुदानावर सौर कृषिपंप उपलब्ध आहे.
पंपाची क्षमता 3 HP, पंपाची किंमत (GST सह) रु. 1,93,803/-, लाभार्थी हिस्सा (प्रवर्गनिहाय) सर्वसाधारण (10%)-19380 अनुसुचित जाती(5%)-9690, अनुसुचित जमाती(5%)-9690
पंपाची क्षमता 5 HP, पंपाची किंमत (GST सह) रु. 2,69,746/-, लाभार्थी हिस्सा (प्रवर्गनिहाय) सर्वसाधारण (10%)-26975 अनुसुचित जाती(5%)-13488, अनुसुचित जमाती(5%)-13488
पंपाची क्षमता 7.5 HP, पंपाची किंमत (GST सह) रु. 3,74,402/-, लाभार्थी हिस्सा (प्रवर्गनिहाय) सर्वसाधारण (10%)-37440 अनुसुचित जाती(5%)-18720, अनुसुचित जमाती(5%)-18720
सौर कृषिपंप आस्थापनेचे उद्दिष्ट, पीएम- कुसुम योजनेच्या शासन निर्णयातील नमूद तरतूद, जिल्ह्याच्या ग्रामीण लोकसंख्येनुसार व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर पूर्ण करावयाचे आहे. महाऊर्जामार्फत शेतकऱ्यांचे नवीन अर्ज स्विकरण्यासाठी कुसुम योजनेचे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. महाऊर्जा मार्फत ऑनलाईन पोर्टल सुरु केल्यानंतर त्यास प्रचंड प्रतिसाद प्राप्त होत आहे.
महाऊर्जाच्या खालील संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करण्यात यावा.
https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojna-Component-B
योजनेची व ऑनलाईन अर्ज करण्याची सर्व माहिती महाऊर्जा www.mahaurja.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपाचा लाभ घेण्याकरीता विभागीय महाव्यव्यस्थापक महाऊर्जा मुंबई यांनी आवाहन केले आहे.
*********
Comments
Post a Comment