पालघर तालुक्यातील माकुणसार येथे गोबरधन प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न



*पालघर तालुक्यातील माकुणसार येथे गोबरधन प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न* 
माकूणसार (प्रतिनिधी)पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन ग्रामीण अंतर्गत पालघर जिल्ह्यात मौजे मागून सात येथे गोवर्धन प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा आज जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या हस्ते तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, समाज कल्याण समिती सभापती मनीषा निमकर पंचायत समिती सभापती शैला कोलेकर उपसभापती मिलिंद वडे पंचायत समिती सदस्य मीना धोडी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रकल्पामध्ये   जनावरांचे शेण, स्वयंपाकघरातील उरलेला भाग, पिकांचे अवशेष, बाजारातील कचरा आणि मैलागाळ यासह मोठ्या प्रमाणात जैव-कचऱ्याचा उपयोग करून गावात स्वच्छता सुनिश्चित करणे, बायोगॅसमध्ये टाकून ऊर्जा निर्माण करणे आणि ग्रामस्थांचे जीवन सुधारणे, गोबरधन योजनेमुळे घनकचरा, विशेषत: गावांमधील जैव-कृषी कचरा सुरक्षित आणि प्रभावी व्यवस्थापनामध्ये लोकांशी संलग्न होणे अपेक्षित आहे. जेणेकरून गावे स्वच्छ राहतील या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
यावेळी  जलजीवन मिशन चे प्रकल्प संचालक अतुल पारस्कर, कार्यकारी 
अभियंता (पा.पु) गंगाधर निवडुंगे,गटविकास अधिकारी पालघर नरेंद्र रेवंडकर उपस्थित होते.

 अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने माकुणसार ग्रामपंचायत कार्यालयात दोन आदर्श महिलांचा सत्कार अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजरी करण्यात आली.
तसेच स्वातंत्र्याच्या अमृत मोहोस्तवा निमित्त जिल्हा परिषद पालघर आणि टाटा मोटर्स CSR यांच्या संयुक्त विद्यमाने. पालघर जिल्ह्यातील ७५ तलावाचे खोलीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. यावेळी ग्रामपंचायत माकूणसार याठिकाणी सुरू करण्यात आले.  टाटा मोटर्स चे शैलेश माहुलीकर आणि बायफ संस्थेचे अभियंता  सिद्धार्थ बोरगावकर, ग्रामस्थ उपस्थित होते.
यामध्ये नरेगा विभागाच्या माध्यमातून ग्रामस्थाना तलावाच्या बाजूने फिरण्यासाठी पेव्हर ब्लॉक चा रस्ता देण्यात येणार असून, निघणाऱ्या गाळाचा वापर हा गावातील विकास कामांसाठी करण्यात येणार आहे. तसेच टाटा मोटर्स csr यांच्या माध्यमातून तलावातील गाळ काढणे तसेच तलावाच्या बाजूने वृक्ष लागवड करणे अशी कामे करण्यात येणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

डहाणू-नरपड ते चिखला मार्ग पुराच्या पाण्याने खचला; वाहतूक पूर्णपणे बंद, नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

केळवेत अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमध्ये संताप; चौकशीची मागणी