श्री. सुधाकर ठाकूर, संपादित कर्दळीबन केळवे पुस्तकाचे प्रकाशन संपन्न.
श्री. सुधाकर ठाकूर, संपादित कर्दळीबन केळवे पुस्तकाचे प्रकाशन संपन्न.
दिनांक ३१ मे
सफाळे ( एच. लोखंडे ) दिनांक २८ मे २०२३ रोजी श्री कालीकादेवी मंदिर सभागृह केळवे ता. जि. पालघर येथे पालघर तालुका मराठी साहित्य मंडळ व सेवानिवृत्त जेष्ठ नागरिक संघाच्या संयुक्त विद्यमाने श्री. सुधाकर ठाकूर - साहित्यिक संपादित *कर्दलीबन केळवे* या पुस्तकाचे प्रकाशन मा. श्री. डॉ. किरण सावे - प्राचार्य, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय यांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आले.
श्री. अशोक ठाकुर- पसाय प्रकाशनाचे प्रकाशक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत, उपस्थित साहित्य प्रेमी यांचे शब्द सुमनांनी स्वागत केले. श्री. हरिहर पाटील - कार्यक्रम समारोह अध्यक्ष, व्दारा मा. डॉ. किरण सावे - प्राचार्य सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर - कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांचे शालेय, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी डॉ. किरण सावे यांनी बोलताना सांगितले. साहित्यिक श्री. सुधाकर ठाकूर संपादीत "कर्दलीबन केळवे" हे पुस्तक म्हणजे, एक ऐतिहासिक दस्तऐवज असून. यात अंतर्भूत असलेली, विविध विषयांसंबंधीत माहिती महत्त्व पुर्ण आहे. श्री. हरिहर पाटील - समारंभ अध्यक्ष यांनी स्व. रामचंद्र सदाशिव ठाकुर माजी सरपंच यांनी गत काळातील घटना पासून,तरूण पिढीला, वर्तमान काळात बोध घेण्यासाठी लिहून ठेवलेल्या लेखांचे संकलन करून ठेवणारे खरोखर दूरदृष्टीचे होते असे सांगत. केळव्याचा इतिहास लेखनाची त्यांची संकल्पना त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे सुपुत्र सुधाकर ठाकुर यांनी पुस्तक स्वरूपात प्रकाशित केली असे सांगत. आयोजकांना धन्यवाद दिले. तर जयप्रकाश ठाकुर यांनी जुन्या आठवणीना उजाळा दिला.
व्यासपीठावरील मान्यवर व उपस्थित साहित्य प्रेमी यांना पुस्तकांच्या प्रती विनामूल्य वितरीत करण्यात आल्या. या प्रसंगी श्री. जमील शेख - अध्यक्ष पालघर तालुका साहित्य मंडळ. जयप्रकाश ठाकुर अध्यक्ष - सेवा निवृत्त जेष्ठ नागरिक संघ केळवे. आर. एम. पाटील-कवी, जयवंत चौधरी, स्मिता पाटील- प्राध्यापिका, अनंत पाटील, विनोद पाटील, विनोद म्हात्रे, धनेश वर्तक, नरेंद्र ठाकुर, अरविंद वर्तक, हरिश्चंद्र चौधरी, विविध शेत्रातील मान्यवर, ठाकुर कुटुंबीय आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जमील शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्य प्रा. स्मिता पाटील यांनी पसायदान सादरीकरण करून केले.
Comments
Post a Comment