पालघर पंचायत समिती मार्फत स्त्री शक्ती समाधान शिबिर सम्पन्न

*पालघर पंचायत समिती मार्फत  स्त्री शक्ती समाधान शिबिर सम्पन्न*
पालघर (प्रतिनिधी)पालघर पंचायत समिती मार्फत *शासन आपल्या दारी* या अभियानांतर्गत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाकडुन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्त्री शक्ती समाधान  शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. 

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे,समाजकल्याण समिती सभापती मनीषा निमकर, तहसीलदार सुनील शिंदे,जिल्हा परिषद सदस्य वैदेही वाढाण,नीता पाटील,सारिका निकम,करिष्मा उमतोल,पंचायत समिती सभापती भारती कोलेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर संपन्न झाले.
 या योजना कागदावरच न राहता प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोहोचवणे ही सर्वस्वी शासनाची जबाबदारी आहे. तसेच घराघरांत  योजना पोचल्या  तरच त्याची यशस्वी अंमलबजावणी होईल, असे सांगून सर्वांनी महिलांना समान वागणूक दिली तर महिलांचा खरा अर्थाने सन्मान आहे. असे प्रतिपादन जिल्हापरिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी केले.

या योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक महिलेच्या समस्या सोडवून शासनाचा या योजनेमागचा उद्देश सफल करण्यासाठी प्रयत्न करू असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आश्वासित केले.
 सदर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबीरात  प्रत्येक विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते.  महिलांना ज्या काही समस्या दैनंदिन जिवन जगताना येत असतात उदा. ओराग्याच्या, सुरक्षा, स्वच्छता, रस्ते, पाणी, शासकीय योजना, शासकीय दाखले, उद्योग महिला सक्षमीकरण , महिला बचत गट, रेशन कार्ड किंवा इतर समस्या या समस्यांबाबत अर्जाच्या माध्यमातून समस्या समाधान शिबीर च्या दिवशी आपल्या समस्याचे निराकरण कण्यास निराकरण करण्यात येईल मदत होईल, या हेतूने हे शिबीर आयोजित करण्यात आले.
समस्या समाधान शिबीरा मध्ये योजनांची माहीती प्रत्येक स्टॉल वर उपलब्ध करून देण्यात आली.

*एका दिवसात११६ महिलांनी या शिबिरात अर्ज दाखल केले.*
सभापती मनीषा निमकर,जिल्हा परिषद सदस्य वैदेही वाढाण यांनी आपल्या मनोगतातून महिलांना मार्गदर्शन केले.
 कार्यक्रमाचे प्रस्ताविक बालविकास प्रकल्प अधिकारी गौरी धांगडा यांनी केले.यावेळी पंचायत समिती सदस्य, बालविकास प्रकल्प अधिकारी,मुख्य सेविका, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

डहाणू-नरपड ते चिखला मार्ग पुराच्या पाण्याने खचला; वाहतूक पूर्णपणे बंद, नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

केळवेत अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमध्ये संताप; चौकशीची मागणी