जिल्हा विकास आराखडयात (District Strategic Plan) नागरिकांच्या मतांचाही होणार विचार ३१ मे पर्यंत सुचना / अभिप्राय नोंदविण्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांचे आवाहन
*जिल्हा विकास आराखडयात (District Strategic Plan) नागरिकांच्या मतांचाही होणार विचार*
३१ मे पर्यंत सुचना / अभिप्राय नोंदविण्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांचे आवाहन*
पालघर(प्रतिनिधी) दि. 17 : केंद्र सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला २०४७ पर्यंत विकसित भारत- भारत @२०४७ (India@२०४७) करण्यासाठी संकल्प केला आहे. यामध्ये २०२५-२६ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दीष्ट जाहीर करण्यात आले असून २०३० पर्यंत शाश्वत विकास उद्दीष्टय साध्य करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे.
विकसित भारताची ही उद्दीष्टये साध्य करताना महाराष्ट्र राज्यांने देखील २०४७ पर्यंत संपूर्ण विकसित होणे आवश्यक आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सन २०२७ पर्यंत १ ट्रिलियन डॉलर, सन २०३७ पर्यंत २.५ ट्रिलीयन डॉलर व सन २०४७ पर्यंत ३.५ ट्रिलीयन डॉलर इतकी पोहोचविणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे.
या अनुषंगाने राज्याचे अर्थव्यवस्थेचे ध्येय साध्य करतांना जिल्ह्यातील सामर्थ्य, दुर्बलता, संधी व अडथळा (SWOT) यावर लक्ष केंद्रीत करुन त्यांच्या आर्थिक विकासासाठी सर्वसमावेशक व शाश्वत विकासाची उद्दीष्ट्ये साध्य करण्यास मदत होणार आहे.
पालघर जिल्ह्यातील सामाजिक आर्थिक परिस्थिती आणि नैसर्गिक संसाधनामधील असमानता व जलद शहरीकरणाच्या आव्हानांसमोर जाण्याची आवयश्कता विचारात घेवून प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा विकास आराखडा (District Strategic Plan) तयार करण्यात येणार आहे. पालघर जिल्हा विकास आराखडा तयार करताना जिल्ह्यातील विकासाच्या संभाव्य संधी लक्षात घेवून त्यानुसार गुंतवणूक व विकासाला चालना देणाऱ्या बाबी तसेच कृषि व संलग्न सेवा, उद्योग (वस्तुनिर्मितीसह), जलसंधारण, पायाभुत सुविधा, शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय, रोजगार व स्वयंरोजगार, कौशल्य विकास, पर्यटन इत्यादी क्षेत्रांतील वृद्धी करण्याबाबत नागरिकांचे अभिप्राय जाणून घेणे आवश्यक आहे.
या सर्व समावेशक विकास आराखड्यासाठी जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, नागरिक, विविध सामाजिक/ आर्थिक / शैक्षणिक संघटना व आस्थापनांनी आपल्या सुचना / अभिप्राय दिनांक ३१ मे २०२३ पर्यंत कळवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले आहे. त्यासाठी आपल्या सूचना / अभिप्राय dpopalghar@gmail.com या इमेलवर/ जिल्हा नियोजन समिती, १०१ जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे लेखी स्वरुप्रात दिनांक ३१ मे २०२३ पर्यंत कळविण्यात यावेत.
Comments
Post a Comment