अखिल भारतीय युवा भंडारी समाज या व्हॉट्सॲप ग्रुप द्वारे आपण आपल्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी १०/१२ वी.विद्यार्थांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन टिमा हॉल बोईसर येथे संपन्न.

अखिल भारतीय युवा भंडारी समाज या व्हॉट्सॲप ग्रुप द्वारे आपण आपल्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी १०/१२ वी.विद्यार्थांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन  टिमा हॉल बोईसर येथे संपन्न.

बोईसर (प्रतिनिधी)अखिल भारतीय युवा भंडारी समाज या व्हॉट्सॲप ग्रुप द्वारे आपण आपल्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्याचे ठरविले होते, त्याप्रमाणे  आज शनिवार दिनांक १० जून २०२३ रोजी संपन्न झाले.
सदरच्या शिबिरास मुख्य मार्गदर्शक म्हणून *श्री. सत्यवान यशवंत रेडकर* अनुवाद अधिकारी,मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार.
संस्थापक - तिमिरातूनी तेजाकडे सामाजिक संस्था. हे लाभले होते.
मार्गदर्शन शिबिरास पालक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रथम श्री धीरज गावड यांनी सर्व उपस्थितांचे शब्द सुमनाने स्वागत केले.  मुख्य मार्गदर्शक  श्री. सत्यवान यशवंत रेडकर सरांचे शाल, श्रीफळ व पुष्गुच्छ देवून स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे वसई येथून आलेल्या समाजबांधवांनी सुद्धा श्री. सत्यवान यशवंत रेडकर सरांचे पुष्गुच्छ देवून स्वागत केले.
मार्गर्शन शिबिराचे प्रास्ताविक श्री. श्याम पाटील यांनी केले. 
श्री. मनोज दिवाकर पाटील, श्री. म्हात्रे सर, श्री. जयवंत रूमडे सर यांनी आपले थोडक्यात मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर *श्री. सत्यवान यशवंत रेडकर* सरांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यास सुरवात केली. MPSC/UPSC व इतर सरळसेवा परीक्षा व त्यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता याविषयी मुद्देसूदपणे मार्गदर्शन केले. सरांनी जवळ जवळ ३ तास सोप्या भाषेत व हसत खेळत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. 
कार्यक्रमाच्या शेवटी काही विद्यार्थी व पालकांनी मार्गदर्शन शिबिराविषयी मनोगत मांडले त्यामध्ये आयोजक म्हणून *अखिल भारतीय युवा भंडारी समाज* पालघर जिल्हा, व *श्री. सत्यवान यशवंत रेडकर* सरांचे  विशेष कौतुक करून आभार मानले. 
*अखिल भारतीय युवा भंडारी समाज* या ग्रुप च्या माध्यमातून व आपल्या सर्वांच्या सहार्यामुळेच आजचे हे विद्यार्थी मार्गदर्शनपर शिबिर यशस्वी झाले त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार.
*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन - श्री धीरज कमळाकर गावड यांनी केले तर श्री. प्रणय चूरी यांनी आभाप्रदर्शन केले.* 
आपला नम्र.

Comments

Popular posts from this blog

डहाणू-नरपड ते चिखला मार्ग पुराच्या पाण्याने खचला; वाहतूक पूर्णपणे बंद, नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

केळवेत अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमध्ये संताप; चौकशीची मागणी