सफाळे येथे युगप्रवर्तक आचार्य श्री. महाश्रमणजी यांचे प्रेरणादायी संबोधन.
सफाळे येथे युगप्रवर्तक आचार्य श्री. महाश्रवण यांचे प्रेरणादायी संबोधन.
सफाळे ( एच. लोखंडे ) युगप्रधान आचार्य श्री. महाश्रमण - जैन श्वेतांबर तेरापंथ चे ११ वे आचार्य महाश्रमणजी, १३ पंथ संघटना तहत काम करणाऱ्या सर्व गतविधीचे नेतृत्व करीत आहेत. विशेषतः अणुव्रत, प्रेक्षाध्यान, जीवन, विज्ञान, सर्व तेरा पंथ उप संघटना, जैन विश्व भारती, जैन श्वेतांबर तेरापंथ महासभा आदी यांना मार्गदर्शन करणे. ते एका धार्मिक संघटनेचे आचार्य असूनही त्यांचे उच्च विचार, धर्मनिरपेक्ष असून, अहिंसा, नैतिकता, मूल्य आणि सिध्दांत यांना पाठिंबा देणारे आहेत. त्या गुरूना शतशः प्रणाम.
चातुर्मास निमित्ताने गुरूदेव मुंबईहुन भ्रमंती करीत आहेत. केळवे रोड ता. जि. पालघर येथून सफाळे येथे प्रस्थान करताना, स्थानिक जैन उपाश्रय मधील जैन समाजाला आशिर्वाद देत, क्षेत्रीय सबंधित मुनी प्रिन्सकुमार, ज्ञातीजन यांच्यासह उपासना करून, स्थानिक जैन उपाश्रयामध्ये सर्वांसमक्ष मंगल पाठ प्रदान करण्यात आला.
दिनांक ४ जून रोजी युगप्रधान आचार्य श्री. महाश्रमणजी यांचे सफाळे येथे आगमन झाले असताना. त्यांच्या स्वागतासाठी भाविकांच्या जनसमुदायाने स्वस्तिक पार्क ( सफाळे पुर्व ) ते राजगुरू ह. म. पंडित विद्यालय पर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आलेली. मिरवणुकीचे रूपांतर नंतर मा. आचार्य श्री महाश्रमणजी यांच्या सुविचारांची मेजवानीला ऐकण्यासाठीच्या महासागरत झाली.
कार्यक्रमाची सुरूवात महिला मंडळ व्दारे स्वागत गीताने करण्यात आली. तसेच १३ पंथी कन्या मंडळ व ज्ञानार्था यांच्या कडून, आचार्य महाश्रवणजी यांना अभिवंदना देण्यात आली. विश्रुताविभा स्वाधी प्रमुख यांनी सर्वाना संबोधन केले. अंदाजे ८ वर्षानी मनिषी मुनी, महेंद्र कुमार, मुनी अजित कुमार, मुनी जंबु कुमार, मुनी अभिजित कुमार, मुनी मोहजीत आदी गुरु शिष्य मिलनांचा सोहळा पाहून सर्वाचे डोळे पाणावले.
अश्या प्रसंगी प्रसंगी *युग प्रधान आचार्य श्री. महाश्रमणजी* यांनी विशाल जनसमुदायास संबोधन करताना सांगितले. मनुष्याने शरीराने सक्षम ( निरोगी ) असतानाच, धर्माचे पालन करावे. शरीर निरोगी ( सशक्त ) असेल तरच धर्माच्या प्रचारास / प्रसारासाठी आपले सहकार्य मिळू शकेल. शरीर अशक्त / कमकुवत / व्यधीग्रस्त असेल तर धर्माचे कार्य करताना अडथळे येतील. माणसाला जो पर्यंत म्हातारपण येत नाही, तो पर्यंत त्यांने धर्माचे पालन केले पाहिजे. अंगात आजार, वेदना, असल्यास धर्माचे पालन / आचरण करतांना अडथळे येतात. इंद्रिये साथ देत नाहीत. सेवाही करता येते नाही. त्यासाठी माणसाने शरीराने सशक्त / निरोगी ( सुद्रुढ ) राहणे अपेक्षित आहे. मानवाने आपल्या शरीरात सशक्तपणा आहे, तोवर आपल्या आत्म्याच्या कल्याणासाठी, धर्माचे पालन केलेच पाहिजे. अंध, अपंग, आजारी आणि सेवा धर्माचे संबंधितांची सेवा करणे हिच खरी सेवा आहे. यासाठी आपण आपली शरीर संपत्ती अबाधित ठेवून, धर्माचे आचरण करीत, आपले जीवन चांगले करण्यासाठी प्रयत्न करणे हाच सेवा धर्म असल्याचे सर्वांना संबंधित करताना युग प्रधान आचार्य श्री. महाश्रमणजी यांनी सांगितले. स्वाध्वी विरांग साधना यांनी ही या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केलेल्या. तर १३ पंथी सभेचे पदाधिकारी यांनीही आप आपले विचार व्यक्त केले ्
Comments
Post a Comment